Stock Market Explainer: एक तासात गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी 'खल्लास' तरीही दुपारपर्यंत बाजार का सावरत आहे?

मोहित सोमण: सुरूवातीच्या एक तासात गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटींचे नुकसान झाले असले तरी पुन्हा एकदा शेअर बाजाराने युटर्न घेण्याची मानसिकता दर्शवत आहे. सुरुवातीच्या कलात ६०० पूर्णांकाने बाजार कोसळले होते. जानेवारी महिन्यात शेअर बाजारात कॅश सेगमेंटमधील ४३००० कोटींचे शेअर विकले गेले असताना मागील सत्रात तेजीच्या सकारात्मकतेमुळे ४८० कोटी मूल्यांकनाची शेअर खरेदी केली गेली. २ दिवसांच्या रॅलीनंतर अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावधगिरीचा पवित्रा घेतला असताना सुरूवातीच्या काळात बाजार कोसळले असले तरी पुन्हा एकदा बँक निर्देशांकात वाढ सुरु झाल्याने बाजार सावरला आहे. सुरूवातीच्या कलात बँक निर्देशांकात ३०० पूर्णांकाने घसरण होऊन सुद्धा दुपारी १२ वाजेपर्यंत १०० अंकांनी बँक निर्देशांकात वाढ झाली जे तेजीचे द्योतक असल्याचे स्पष्ट झाले.


बाजारात अस्थिरता का?


सुरुवातीच्या कलात शेअर बाजारात २% अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) उसळत होता. दुपारी १२ वाजेपर्यंत तो ०.३५% पातळीवर मर्यादित राहिला. दुसरीक डे आज अर्थसंकल्पाचे सर्वेक्षण सादर केले जाणार असल्याने गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा शेअर बाजारातील खरेदी वाढवण्यास सुरुवात केल्याने बाजारात फायदा दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे अर्थसंकल्प ऐतिहासिक म्हटल्यानंतर तज्ञांच्या मते या अर्थसंकल्पात तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा, निर्यात यावर विशेष लक्ष दिले जाऊ शकते असे म्हटल्यावर गुंतवणूकदारांच्या चिंतेत घट झाली.


जागतिक अस्थिरतेचा पार्श्वभूमीवर मेटल, तेल व गॅस, कमोडिटी शेअर्समध्ये वाढ होत असताना रूपयांच्या तुलनेत डॉलर उसळल्याने सुरूवातीच्या विनिमयात रूपया पुन्हा एकदा निचांकी स्तरावर गेल्याने रूपयाने डॉलरच्या तुलनेत ९२ पातळी ओलांडली ज्यामुळे बाजारातील परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आकर्षण कमी झाले. परंतु पुन्हा एकदा ४ पैशाने रूपया वधारला असल्याने बाजारात सुधारणा होत असल्याचे स्पष्ट झाले.


कमोडिटी व कच्च्या तेलाच्या दरात वाढ ज्याचा फायदा तेल व गॅस, मेटल शेअर्समध्ये -


कमोडिटी व कच्च्या तेलाच्या निर्देशांकात सुरूवातीला मोठी अस्थिरता कायम होती. युएस व इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे दोन्ही क्षेत्रात मोठ्या प्रमाणात किंमतीत वाढ झाली. मात्र त्या तुलनेत डॉलरच्या तुलनेत कमोडिटीत दबाव पातळी वाढल्याने भारतीय बाजारात रूपयांचे महत्व वाढले अंतिमतः दुपारपर्यंत बाजार सावरण्यास सुरुवात झाली. गेल्या दोन आठवड्यात सातत्याने कच्च्या तेलाच्या व सोन्याचांदीच्या दरात वाढ होत आहे. आज सकाळी बेंचमार्क ब्रेंट क्रूडच्या किमतीत जवळपास २% वाढ झाली होती. ती प्रति बॅरल ७० डॉलरच्या जवळ पोहोचली आहे ज्यामुळे देशांतर्गत बाजाराच्या भावनांवर दबाव आला होता पुढेही अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढू शकतात आणि दीर्घकाळापर्यंत उच्च पातळीवर राहू शकतात, असे संकेत मिळत असताना मात्र दुपारी १२ वाजेपर्यंत WTI Futures तेल १.८७% उसळीवर मर्यादित राहिले.


तरीही गुंतवणूकदारांत चिंता का असेल?


हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, एफआयआयच्या अल्प ते मध्यम-मुदतीच्या धोरणात कोणताही बदल झालेला नाही,जे भारतातील शेअर्स विकणे आणि तो पैसा इतर चांगल्या कामगिरी करणाऱ्या बाजारांमध्ये गुंतवणे हे आहे. त्यामुळे, जोपर्यंत अर्थसंकल्पात अशी कोणतीही मोठी घोषणा होत नाही, ज्यामुळे एफआयआय भारतात परत येण्यास प्रवृत्त होतील, तोपर्यंत ते भारतात विक्री करतच राहतील ज्यामुळे बाजारात घसरण सुरूच राहील 'असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनीतिकार व्ही.के. विजयकुमार प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत. त्यामुळे अद्यापही गुंतवणूकदारांना बजेटची घोषणा होईपर्यंत अस्थिरता जाणवू शकते असे सांगितले जात आहे.


तसेच भूराजकीय तणावाच्या भीतीने गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरानकडे आपल्या अणुकार्यक्रमावर वाटाघाटी करण्यासाठी आणि संभाव्य अमेरिकन लष्करी कारवाई टाळण्यासाठी फारसा वेळ शिल्लक नाही अशी धमकी दिल्यानंतर, इराणने अमेरिकेच्या लष्करी कारवाईला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्थिरता अधिक वाढत आहे. ज्याचा फटका आशियाई बाजारासह भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांना बसू शकतो.अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे इंधनाच्या किमती वाढू शकतात, महागाई वाढू शकते आणि जागतिक अर्थव्यवस्था व शेअर बाजाराला मोठा धक्का बसू शकतो. दरम्यान आखातात अमेरिकेचे लष्करी बळ वाढवताना इराणने कोणत्याही अमेरिकन हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिल्याने भूराजकीय परिस्थिती गुंतागुंतीची दिसत आहे.

Comments
Add Comment

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमात बदल

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी 5 ऐवजी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान, 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी मुंबई :

सोशल मीडिया वापरासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना निर्बंध, फेसबुक-एक्सवर पोस्ट कर्मचाऱ्यांना महागात पडणार

मुंबई : राज्य शासनाचे कर्मचारी आपल्या वैयक्तिक सोशल मीडिया अकाऊंटवर गणवेशातील फोटो, कार्यालयाचे लोगो, पदनाम,

१० फेब्रुवारी १२वी, २० फेब्रुवारी ला १०वीची परीक्षा

सुभाष म्हात्रे, अलिबाग : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी रायगड जिल्हा

कोकणातील कोळीवाड्यांच्या जमिनी अधिकृत होणार!

सीमांकनासाठी समिती गठीत; तीन महिन्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई : कोकण किनारपट्टीवरील

दादरमधील वाढत्या फेरीवाल्यांच्या समस्येवर महापालिकेचा तोडगा

मुंबई : दादर पश्चिममधील वाढत्या फेरीवाल्यांच्या समस्येबाबत वारंवार तक्रारी होत असतानाच आता मुंबई महापालिकेने

सफाळे आणि केळवे रोड दरम्यान ब्लॉकमुळे रेल्वेसेवेवर होणार परिणाम

ठाणे : गर्डर काढण्याच्या कामामुळे येत्या शनिवारी ३१ जानेवारी रोजी सफाळे आणि केळवे रोड दरम्यान ब्लॉक घेण्यात