पुणे : महाराष्ट्राचे लाडके अजित दादा आज अनंतात विलीन झाले. बुधवारी २८ जानेवारी रोजी अजित दादांचा बारामती धावपट्टी शेजारी दुर्दैवी विमान अपघात झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांसह संपूर्ण महाराष्ट्र शोकाकूल झाला. अजित पवारांसह त्यांच्यासोबाबत प्रवास करणाऱ्या त्यांच्या अंगरक्षकाचा आणि एक क्रू मेंबर, वैमानिक आणि सहवैमानिक यांचाही मृत्यू झाला.
दरम्यान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यायचंय सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या एका अनुभवी वैमानिकाच्या कारकिर्दीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कॅप्टन सुमित याबद्दल खुलासे
या घटनेशी संबंधित वैमानिक कॅप्टन सुमित कपूर यांचा उड्डाणाचा अनुभव मोठा असला, तरी यापूर्वी दोन वेळा १३ ,मार्च २०१० मध्ये एका देशांतर्गत उड्डाणापूर्वी, दिल्ली विमानतळावर, दिल्ली-बंगळूरु (S२ - २३१ ) या उड्डाणापूर्वी ते ब्रेथ अॅनालायझर (BA) चाचणीत मद्यप्राशन स्थितीत कर्तव्यावर आढळल्याची अधिकृत नोंद असल्याचे समोर आpilotsले आहे. नागरी विमान वाहतूक यंत्रणांच्या अहवालानुसार, दिल्ली विमानतळावर तसेच २०१७ मध्ये पुन्हा एका उड्डाणादरम्यान नियमभंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.
दुसऱ्या प्रकरणानंतर नागरी उड्डाण महासंचालनालयाने कठोर निर्णय घेत तीन वर्षांसाठी वैमानिक परवाना निलंबित केला होता. विमान वाहतूक क्षेत्रात ही कारवाई अत्यंत गंभीर मानली जाते. मात्र, निलंबन कालावधी संपल्यानंतर संबंधित वैमानिक पुन्हा सेवेत दाखल झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रवासासाठी खासगी ऑपरेटरकडून या वैमानिकाची नियुक्ती कशी करण्यात आली, यावरही चौकशीची सुई वळली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या व्हीआयपी उड्डाणांसाठी वैमानिकांची निवड करताना पार्श्वभूमी तपासणीचे निकष पाळले गेले होते का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
बारामती येथे झालेल्या घटनेत विमानाने पहिल्या प्रयत्नात लँडिंग न केल्याने ‘गो-अराउंड’ घेण्यात आला आणि त्यानंतर अपघात घडला. प्राथमिक अंदाजानुसार, तांत्रिक कारणांबरोबरच मानवी चुकांची शक्यताही तपास यंत्रणा पडताळून पाहत आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे व्हीआयपी विमानसेवांमधील सुरक्षेच्या यंत्रणांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संपूर्ण चौकशी पूर्ण झाल्यानंतरच नेमकं जबाबदार कोण हे स्पष्ट होणार आहे