आर्थर रोड कारागृहात कैद्याचा पोलिसावर हल्ला

मुंबई : आर्थर रोड कारागृह हे देशातील सर्वाधिक सुरक्षित कारागृहांपैकी एक म्हणून ओळखले जाते. याच कारागृहात पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाबला ठेवले होते. पण ताज्या घटनेमुळे हे कारागृह खरंच एवढे सुरक्षित आहे का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ताज्या वृत्तानुसार मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात कैद्याने पोलिसावर हल्ला केला आहे.

लोकेंद्र उदयसिंग रावत हा कैदी मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात शिक्षा भोगत आहे. याच कैद्याने जेलच्या मुख्य दाराजवळ मोकळ्या जागेत कर्तव्यावर असलेल्या अर्थात ड्युटी करत असलेल्या पोलिसांकडे बघत शिव्या देण्यास सुरुवात केली. वाघ नावाच्या पोलीस शिपायाने लोकेंद्रला गप्प बसण्यासाठी दरडावून बघितले तर लोकेंद्रने वाघ यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस शिपाई वाघ गंभीर जखमी झाले.

कैदी लोकेंद्र उदयसिंग रावत हा पोलीस शिपाई वाघ यांच्यावर हल्ला करत असल्याचे बघून इतर पोलीस घटनास्थळी धावले, त्यांनी लोकेंद्रला चोप दिला आणि ताळ्यावर आणले. यानंतर कैदी लोकेंद्र उदयसिंग रावत याच्या विरोधात पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणण्याबाबतचा गुन्हा नोंदवला. जखमी झालेल्या पोलीस शिपाई वाघ यांना उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले. पण ताज्या घटनेमुळे मुंबईचे आर्थर रोड कारागृह आता सुरक्षित आहे का ? असा प्रश्न उपस्थित झा
Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : राज्यातील सर्वात मोठा परीक्षा घोटाळा उद्धव ठाकरेंच्या काळात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नापास विद्यार्थ्यांना पास करण्याचा 'मविआ'चा पराक्रम मुंबई : "महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा शिक्षक

Ameet Satam : ‘सीजीपी’चे आंदोलन हे देशाबाहेरील शक्तींचे षडयंत्र!

- अमित साटम; डाव्या संघटना आणि राष्ट्रविरोधी शक्तींचा आंदोलनात हात मुंबई : "भारत लवकरच ५ ट्रिलियन डॉलर्सची

Nashik : नाशिकमध्ये गरोदर मातांसाठी ‘माहेरघर’ उपक्रम; उपक्रमाची वैशिष्ट्ये काय ?

Nashik : नाशिकमध्ये आरोग्य विभागाच्या वतीने पाच वर्षापासून ‘माहेरघर’ उपक्रम राबविण्यात येत आहे. आदिवासीबहुल

PV Sindhu : भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूंचे आव्हान संपुष्टात

मुंबई : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूचा (PV Sindhu) चायना ओपन २०२६ (China Open 2026) मधील प्रवास अंतिम १६ च्या फेरीतच

Bengaluru Triple Murder : AIच्या मदतीने रचला 3 खुनांचा कट; बंगळुरू ट्रिपल मर्डरप्रकरणात धक्कादायक माहिती समोर

बंगळुरू : बंगळुरूमधील चर्चेत असलेल्या तिहेरी हत्याकांडाच्या (Triple Murder Case) तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Maharashtra Monsoon Update : महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम! राज्यात आतापर्यंत सरासरीच्या ९५ टक्क्यांहून अधिक पाऊस

- पालघरमध्ये एका दिवसात तब्बल १८३ मिमी पावसाची नोंद मुंबई : राज्यात मान्सून (Maharashtra Monsoon Update) पुन्हा सक्रिय झाला असून