माणूस आणि मन

मर्थ रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक हे खूप प्रसिद्ध आहेत. मनाचे श्लोक माहीत नाहीत असा माणूस निराळाच. त्यांच्या श्लोकातील एक ओळ नको रे मना क्रोध हा खेदकारी। नको रे मना
काम नानाविचारी किती मार्मिक वर्णन आहे मनाचे.



माणसाच्या विचारांना आणि आपल्या शरीरातील सर्व इंदियांना नियंत्रणात ठेवणारा आहे एक महत्त्वाचा अवयव जो अतिशय मौल्यवान आहे. तो अवयव म्हणजे मन आहे. माणसाला ज्ञान प्राप्त करून देणारा आहे. माणसाचे मन हा त्याच्या शरीरातील एक महत्त्वाचा आणि विलक्षण शक्ती असलेला अवयव आहे. मनात आत्मविश्वास आणि संयम असेल तर माणूस जगात काहीही साध्य करू शकतो. मनातील संवेदनांचे प्रतिबिंब चेहऱ्यावर उमटत असते. एवढेच काय आपल्याला काही त्रास होत असेल किंवा आपण आजारी असलो तरी काहीतरी आपले बिनसले असल्याचे समोरच्याला समजते. आपला चेहरा हाच आपल्या मनाचा आरसा आहे. माणसाचे व्यक्तिमत्त्व हे त्याच्या मनाच्या जडणघडणीवर अवलंबून असते. आपले मन किती सुसंस्कृत आणि कणखर आहे यावर आपले मोठेपण अवलंबून आहे. माणसाच्या मनाचे दोन कप्पे असतात. चांगल्या - वाईट घटनांच्या, विचारांच्या गोष्टींची साठवण तो त्या कप्प्यात करत असतो. चांगल्या गोष्टी मनात साठवून वाईट गोष्टींचा निचरा करणे शिकले पाहिजे. एकदम एका दिवसात ते शक्य नाही थोडे अवघड आहे पण अशक्य नाही. आपले जर शरीराचे वजन वाढले असेल तर आपण वजन कमी करण्यासाठी व्यायाम करतो पण तो एकच दिवस करतो आणि आपले वजन कमी होते का? अजिबात नाही. कमीत कमी सतत व्यवस्थित व्यायाम करून महिने – दोन महिन्याने म्हणजेच सरावाने आपण आपले वजन नियंत्रणात आणू शकतो. हीच गोष्ट मनाची आहे. मनाला सतत चांगल्या विचारांची, सतत काहीतरी चांगले ऐकण्याची सवय लावून घ्यायला हवी की जेणेकरून मनाला वाईट विचारांचा स्पर्शच होता कामा नये आणि हे शक्य होते ते फक्त वाचनाने, अभ्यासाने. आपले जेव्हा एखाद्या व्यक्तीबरोबर मतभेद होतात तेव्हा आपण तावातावाने बोलू लागतो. समोरच्या व्यक्तीने केलेल्या कृत्याचा आपणास राग येतो. ज्याच्याबरोबर मतभेद झालेला आहे तो आणि ज्याचा मतभेद झालेला आहे तो या दोघांचेही भांडण विकोपाला जाते मग एकमेकांबद्दल वाईट बोलणे, शिव्याशाप सुरू होतात. एकप्रकारे अविचाराचा त्याठिकाणी प्रवेश झालेला असतो. जेव्हा मतभेदाचा क्षण येतो तेव्हा कायम आपले मन विचलित होऊ न देता, अजिबात ढळू न देता शांत राहून नंतर जेव्हा आपले डोके शांत होईल तेव्हा विचार करून त्यानंतर मार्ग काढावा. न जाणो, तुमचा राग शांत होईपर्यंत समोरच्याचाही राग शांत झाला असेल, त्यालाही त्याची चूक समजली असेल. रागाच्या भरात घेतलेले निर्णय अयोग्यच असतात, याची खात्री बाळगावी. अशी अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला असतात की अविचाराने निर्णय घेऊन चांगली लोकं, मैत्री, नातेवाईक दुरावले गेलेले असतात. त्यामुळे कोणताही विचार करताना दहा वेळा विचार करावा म्हणजे पश्चातापाची वेळ येत नाही.



असे म्हणतात, ‘ रिकामे मन म्हणजे सैतानाचे घर असते’ त्यामुळे शरीर व मन नेहमी व्यग्र असणे गरजेचे आहे. कारण शरीराला काही काम नसेल तर व्यक्ती आळशी बनतो, साध्या साध्या गोष्टी करण्यातही त्याला आळस येतो मग तो दुसऱ्यावर अवलंबून राहू लागतो. त्याप्रमाणे मनाचेही आहे. मनही सतत वेगळेच विचार करू लागते. चांगले विचार कधी पटकन येत नाहीत, त्यामुळे आपले मन कुठेही भटकू देऊ नये. मनाचे हेलकावे कुठेही जाण्यापेक्षा मन आपल्या ताब्यात असेल तर अगदीच उत्तम. काहीच काम नसेल, काहीच करण्यासारखे नसेल तर नामस्मरण करावे नामस्मरणात अशी ताकद आहे जी व्यक्तीला आणि त्याच्या मनाला भरकटू देणार नाही. जसे प्रत्येक व्यक्ती आपण चांगले वा सुंदर दिसावे म्हणून सतत प्रयत्नशील असते तसेच आपले मनही सुंदर राहील हाही प्रयत्न व्हायला हवा. खरे ना !

Comments
Add Comment

संसारी असावे सावध

जीवन संगीत,सद्गुरू वामनराव पै सर्ग, नियम व आपले कर्म यांचा आपल्या जीवनातील घडामोडींशी, आपण भोगणाऱ्या सुख

नरदेहाचे महत्त्व

परमेश्वराने सारासारविवेकसंपन्न, सर्वोत्कृष्ट, दुर्लभ असा जो नरदेह दिला त्यात, प्रत्येक मानवाने स्वस्वरूपाचे

शंभरी ऋतुराजाची

ऋतुराज,ऋतुजा केळकर मी एक ‘साधी स्त्री’ जीवनाच्या आकडेमोडीत हरवलेली. संसार, लग्न, मुलं या साऱ्या घटना जशा एका

महर्षी याज्ञवल्क्य

कदा जनकराजाने आपल्या दरबारात शास्त्रचर्चेसाठी विद्वानांची सभा आयोजित केली होती. त्यावेळी त्याने घोषणा केली की

सुप्रभात

बोलिले जे ऋषी । साच भावे वर्ताया ॥ झाडू संतांचे मारग। आडराने भरले जग ॥ उच्छेदाचा भाग । शेष ठरला तो सेवू ।| अर्थ

संत नामदेव

देव दाखवी ऐसा नाही गुरु देव दाखवी ऐसा नाही गुरु। जेथे जाय तेथे दगड शेंदरू॥ देव दगडाचा बोलेल