मोहित सोमण: कालच्या युरोपियन युनियन व भारत यांच्यातील द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर आजही बाजारात तेजीचे वारे दिसत आहेत. त्यामुळे इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात वाढ झाली. सेन्सेक्स ५१८.६१ अंकांनी व निफ्टी १२७.४० अंकाने उसळला आहे. काल बाजारात तेजी उद्भवण्याची बँक निर्देशांकातील तेजी कारणीभूत ठरली. आजही दोन्ही बँक निर्देशांकात तेजी दिसत असून क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ मिडिया, मेटल, आयटी, फायनांशियल सर्विसेस २५/५०, प्रायव्हेट बँक निर्देशांकात झाली असून सर्वाधिक घसरण एफएमसीजी, हेल्थकेअर, फार्मा, पीएसयु बँक निर्देशांकात झाली आहे. मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्ये मात्र चांगलीच तेजी दिसली असून बाजारात सपोर्ट लेवल मिळण्यास त्यामुळे मदत झाली.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ इंटरनॅशनल जेम (९.८३%), ऑईल इंडिया (९.२४%), तेजस नेटवर्क (७.२४%), आयटीआय (६.५४%), एमसीएक्स (५.९६%), ओएनजीसी (५.२०%), डेटा पँटर्न (४.९७%), रिलायन्स पॉवर (४.७४%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण एशियन पेंटस (५.६७%), होम फर्स्ट फायनान्स (५.१७%), वन सोर्स स्पेशालिटी (४.६७%), आनंद राठी वेल्थ (३.९८%), टाटा कंज्यूमर (३.८७%), विशाल मेगा मार्ट (३.७०%) समभागात झाली आहे.