मोहित सोमण: आजही भारत व युरोपियन युनियन द्विपक्षीय एफटीए कराराचा प्रभाव राहिला आगामी अर्थसंकल्पाबाबत अनिश्चितता असतानाही गुंतवणूकदारांनी मजबूत फंडामेंटल आधारे भरभरून प्रतिसाद दिल्याने आज शेअर बाजाराने उसळी घेतली. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढ झाल्याने सेन्सेक्स ४८७.२० अंकाने उसळत ८२३४४.६८ पातळीवर व निफ्टी १६७.३५ अंकाने उसळत २५३४२.७५ पातळीवर स्थिरावला आहे. आज अखेरच्या सत्रात सेन्सेक्स बँक व बँक निफ्टीत निर्देशांकात समाधानकारक वाढ झाल्याने बाजारात आधारभूत पातळी निश्चित झाली आहे. इतर क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ तेल व गॅस,रिअल्टी, पीएसयु बँक, रिअल्टी, मिडिया, मेटल निर्देशांकात झाली असून सर्वाधिक घसरण एफएमसीजी, हेल्थकेअर, फार्मा निर्देशांकात झाली आहे.
भारत-ईयु मुक्त व्यापार करारामुळे गुंतवणूकदारांच्या भावनांना आणखी पाठबळ मिळाले होते निर्यात-केंद्रित क्षेत्रांसाठी आणि पुरवठा-साखळी यंत्रणेसाठी ही सकारात्मक बाब मानली जाते. गेल्या काही सत्रातील रुपयाचा सततचा कमकुवतपणा, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार विक्री आणि निराकरण न झालेल्या भूराजकीय जोखमींमुळे वाढीला उच्च पातळीवरील रॅली होण्यासाठी मात्र प्रतिकार (Resistance) दिसला आहे. गुंतवणूकदारांसाठी आता लक्ष आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाकडे वळले आहे असून ज्याचा काही प्रमाणात परिणाम दिसू शकतो असे असताना आशियाई बाजारपेठा आज संमिश्रित राहिला असला तरी बहुतांश निर्देशांकात वाढ झाली आहे. आज एकूणच इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाने तांत्रिकदृष्ट्या चांगली चांगली कामगिरी केली सुरुवातीच्या व्यापारात सावधगिरी बाळगली जात असताना मोठ्या प्रमाणात गुंतवणूक राखली गेल्याचे चित्र या निमित्ताने स्पष्ट झाले. तांत्रिकदृष्ट्या विश्लेषकांचे मते जास्त विक्रीच्या पातळीपासून शॉर्ट-कव्हरिंगमुळे सुरुवातीच्या व्यापारात बेंचमार्क निर्देशांक वाढू शकतात. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात तिन्ही निर्देशांकात वाढ झाली आहे.
भारतीय शेअर बाजारात अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ तेजस नेटवर्क (१४.४९%),डेटा पँटर्न (१३.६३%), हिंदुस्थान कॉपर (१२.६७%), ओला इलेक्ट्रिक (१०.२१%), शिंडलर इलेक्ट्रॉनिक्स (१०.२०%), बीईएमएल (१०.०८%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण रेडिको खैतान (६.०६%), होम फर्स्ट फायनान्स (४.८६%), टाटा कंज्यूमर (४.६८%), एशियन पेंटस (४.२३%), विशाल मेगा मार्ट (४.१३%), बर्जर पेंटस (३.३२%), भारती हेक्साकॉम (२.९६%), सीसीएल प्रोडक्ट (२.९७%) समभागात झाली आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,' भारत-ईयू एफटीएमुळे देशांतर्गत बाजारांनी सतत आशावाद दाखवला. धातू, वित्तीय आणि तेल आणि वायू क्षेत्रातील मजबूतीमुळे व्यापक निर्देशांकांनी चांगली कामगिरी केली, तर गुंतवणूकदार चक्रीय क्षेत्रांकडे वळले असताना एफएमसीजी समभागांमध्ये नफा बुकिंग दिसून आली आहे.गुंतवणूकदारांनी यूएस फेडच्या धोरणात्मक निर्णयाची वाट पाहत असल्याने जागतिक बाजारपेठांमध्ये संमिश्र व्यवहार झाले. जरी व्यापक अपेक्षा अशी आहे की दर अपरिवर्तित राहतील, परंतु या वर्षाच्या अखेरीस संभाव्य दर कपातीबाबत फेड अध्यक्षांच्या मार्गदर्शनावर लक्ष केंद्रित केले आहे. त्याच वेळी, वाढत्या यूएस-इराण तणाव आणि जागतिक दरांवरील अनिश्चितता एकूण भावना नियंत्रित ठेवण्याची अपेक्षा आहे.'