- बारामती विमानतळाजवळील परिसरात वस्ती असल्याने अनेकांनी हा अपघात प्रत्यक्ष पाहिला. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, विमान धावपट्टीपासून सुमारे १०० फूट आधीच कोसळले. विमान खाली उतरत असताना अपघात होणार, अशी भीती वाटत होती आणि तसेच घडले. धावपट्टीवर आदळताच विमानात मोठा स्फोट झाला आणि भीषण आग लागली. त्यानंतर सलग चार ते पाच स्फोट झाल्याचे त्यांनी सांगितले.
- अपघातानंतर स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले. विमानातील लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की कोणालाही मदत करता आली नाही. काही गावकऱ्यांनी सांगितले की, स्फोटानंतर विमानाचे तुकडे उडून थेट घरांपर्यंत येऊन पडले.
- आणखी एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, विमान आधी गावावरून गेले आणि नंतर खाली उतरताना दिसले. त्यानंतर ते धावपट्टीकडे गेले, उलटले आणि जमिनीवर आदळले. स्फोटानंतर संपूर्ण परिसरात आगीचे लोळ उठले होते.
विमानातील प्रवासी
१. उपमुख्यमंत्री अजित पवार
२. मुंबई पीएसओ हवालदार विदीप जाधव
३. पायलट कॅप्टन सुमित कपूर
४. कॅप्टन शांभवी पाठक
५. पिंकी माळी, फ्लाइट अटेंडंट