Ajit Pawar Passed Away : 'माझा मोठा भाऊ हरपला' - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीवर बोलतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी "माझ्या मनात माझा मोठा भाऊ हरपला अशी भावना आहे," अशा शब्दांमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अजित पवार यांच्या विमानाला आज बुधवार २८ जानेवारी रोजी बारामती येथे मोठा अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला असून त्यांच्यासह अजून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अजित पवार यांचं विमान जळून खाक झालं.


काय म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ? 


"मनाला चटका आणि वेदना देणारी ही घटना आहे. अजितदादा आपल्याला इतक्या लवकर सोडून जातील असा विचारही कोणी केला नसेल. दादा गेली अनेक वर्षे महाराष्ट्राचे नेतृत्त्व करत होते. अतिशय परखड व्यक्तिमत्व होतं त्यांचं.  चूक त्याला चूक म्हणणारे ते असले तरी ते मनाने अतिशय निर्मळ होते, याचा अनुभव मी घेतला आहे. मी त्यांच्यासोबत अनेक वर्षे काम केलं आहे.  अजितदादा यांना काम करताना वेळेच भान नसायचं. सकाळी ६ वाजता देखील ते लोकांना भेटायचे. परवाच आमची एका कार्यक्रमात भेट झाली होती. वयाने आणि अनुभवाने ते माझ्यापेक्षा मोठे होते, त्यामुळेच मला माझा मोठा भाऊ हरपला असं वाटत आहे. "







बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उतरत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाचा ताबा सुटला आणि हा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर सर्वत्र मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. तसेच या अपघातात विमानाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Comments
Add Comment

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी