आयसीसी क्रमवारीत भारताचे वर्चस्व, अभिषेकचे अव्वल स्थान भक्कम; तर सूर्याची वादळी एन्ट्री

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या ताज्या टी-२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंचे निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळत आहे. भारताचा युवा सलामीवीर अभिषेक शर्माने फलंदाजांच्या यादीत आपले अव्वल स्थान अधिक मजबूत केले असून, कर्णधार सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा दिमाखात 'टॉप १०' मध्ये पुनरागमन केले आहे.


न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत बॅटने आग ओकणाऱ्या अभिषेक शर्माने रेटिंगमध्ये झेप घेतली आहे.  अभिषेकचे रेटिंग ९०३ वरून आता ९२९ वर पोहोचले आहे. तो त्याच्या २०२५ मधील ९३१ रेटिंग गुणांच्या ऐतिहासिक विक्रमापासून अवघ्या २ गुण दूर आहे. आगामी सामन्यांमध्ये त्याने ही लय कायम राखल्यास तो टी-२० क्रिकेटमध्ये रेटिंगचा नवा 'हिमालय' सर करेल. भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. न्यूझीलंडविरुद्ध सलग दोन नाबाद अर्धशतके झळकावल्याचा मोठा फायदा त्याला मिळाला आहे. सूर्याने क्रमवारीत थेट पाच स्थानांची प्रगती केली आहे. तो आता ७१७ रेटिंग गुणांसह सातव्या क्रमांकावर विराजमान झाला असून, जगातील पहिल्या १० फलंदाजांमध्ये त्याचा पुन्हा एकदा समावेश झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाने आधीच ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. या विजयाचा फायदा भारतीय खेळाडूंना वैयक्तिक क्रमवारीतही मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसत आहे. चाहत्यांचे लक्ष आता अभिषेक शर्माच्या आगामी विक्रमी कामगिरीकडे लागले आहे. क्रमवारीवर नजर टाकल्यास, पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजांमधील अंतर आता लक्षणीयरीत्या वाढले आहे. इंग्लंडचा फिल सॉल्ट ८४९ रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. अभिषेक आणि सॉल्ट यांच्यातील ही मोठी तफावत पाहता, आगामी टी-२० विश्वचषकात अभिषेक शर्मा 'नंबर वन' फलंदाज म्हणूनच मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे.


तिलक वर्मा 'टॉप ३' मध्ये कायम


भारतीय संघाचा युवा फलंदाज तिलक वर्मा सध्या खेळत नसला, तरी तो ७८१ रेटिंग गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर स्थिर आहे. अन्य फलंदाजांमध्ये इंग्लंडचा जोस बटलर (७७० रेटिंग) चौथ्या, पाकिस्तानचा साहिबजादा फरहान (७६३ रेटिंग) पाचव्या आणि श्रीलंकेचा पथुम निसांका (७५८ रेटिंग) सहाव्या स्थानावर कायम आहे.


सूर्याच्या पुनरागमनाचा इतरांना फटका


सूर्यकुमार यादवने टॉप १० मध्ये पुनरागमन केल्यामुळे ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श आणि टिम सायफर्ट यांना प्रत्येकी एक स्थान खाली घसरावे लागले आहे. मात्र, तरीही हे खेळाडू टॉप १० मध्ये टिकून आहेत. सध्या आयसीसी टी-२० क्रमवारीत भारताचे तीन फलंदाज टॉप १० मध्ये आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यांनंतर या क्रमवारीत पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

अवघ्या १० षटकांत किवींचा उडवला धुव्वा, सूर्या-अभिषेकच्या वादळी खेळीने मालिका खिशात

गुवाहाटी  : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात क्रिकेट विश्वाला अचंबित करणारा विजय

T20I : गुवाहाटीत रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत, भारताला मालिका जिंकण्याची संधी

गुवाहाटी  : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा महत्त्वपूर्ण सामना रविवारी

आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी-२० विश्वचषकातून पत्ता कट, स्कॉटलंडचा प्रवेश

मुंबई  : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अखेर बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या आडमुठ्या भूमिकेवर कठोर कारवाई केली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा मुंबई (प्रतिनिधी) : महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा संपल्यानंतर भारतीय महिला संघ

मुंबईत कुस्तीची महादंगल!

चार राज्यातले दिग्गज पैलवान भिडणार मुंबई : पहिल्यांदाच देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांमधील अव्वल पैलवान एकाच

न्यूझीलंडविरुद्धच्या रायपूर टी २० मध्ये भारताचा विजय, मालिकेत २-० अशी आघाडी

रायपूर : भारताने न्यूझीलंडविरुद्धची रायपूरमधील टी २० मॅच सात विकेट राखून जिंकली. या विजयासह भारताने पाच मॅचच्या