Wednesday, January 28, 2026

अंबरनाथ शहरात घरपट्टी थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू

अंबरनाथ शहरात घरपट्टी थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू

अंबरनाथ : शहरातील मालमत्ता कर थकबाकी असलेल्या नागरिकांना अंबरनाथ नगर परिषद प्रशासनाने अभय योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत थकबाकीदारांना मूळ कर रकमेवर ५०% शास्ती मिळणार आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन नगराध्यक्ष तेजश्री करंजुले-पाटील यांनी केले आहे. ही योजना ३१ मार्च २०२६ पर्यंत लागू राहणार आहे. अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित करदारांनी नगर परिषदेच्या मालमत्ता कर विभागाशी संपर्क साधावा किंवा नगर परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन थकबाकी रक्कम जमा करावी. या योजनेमुळे नागरिकांवरील आर्थिक भार कमी होईल आणि कर वसुलीला प्रोत्साहन मिळून नगर परिषदेच्या महसुलात वाढ होण्यास मदत होणार आहे.

Comments
Add Comment