Tuesday, January 27, 2026

भारतीय इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळी घसरणच अस्थिरता निर्देशांक १३% वर 'या' कारणामुळे

भारतीय इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळी घसरणच अस्थिरता निर्देशांक १३% वर 'या' कारणामुळे

मोहित सोमण: भारत व ईयु एफटीएसाठी अनिश्चितता व युएस इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदारांनी आज एकदा अस्थिर कौल दिला आहे.त्यामुळे सकाळच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात घसरण झाली. सेन्सेक्स २९१.२४ व निफ्टी ७३.६० अंकांने कोसळला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात वाढ झाली असताना बँक निफ्टीत घसरण झाली आहे. विशेष उल्लेख म्हणजे अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) हा १२.९२% जवळपास १३% उसळल्याने बाजारात मोठी अस्थिरता अधोरेखित होते. मिड स्मॉल कॅप शेअर्समध्येही मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने बाजारात तेजीची मानसिकता नसल्याचे अधोरेखित झाले. सुरूवातीच्या करात आज सर्वाधिक घसरण मेटल वगळता कुठल्याही शेअर्समध्ये वाढ झालेली नाही. सर्वाधिक घसरण मिडिया, रिअल्टी,ऑटो, कंज्यूमर ड्युरेबल्स या शेअर्समध्ये झाली आहे. सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ केपीआर मिल्स (१०.५०%), एक्सिस बँक (१०%), रेनबो चाईल्ड (८.७२%), सोना बीएलडब्लू प्रिसीजन (७.४३%), एमसीएक्स (७.३६%), लेमन ट्री हॉटेल्स (६.३५%), युटीआय एएमसी (५.३८%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण आर आर केबल्स (१९.८७%), केपीआयटी टेक्नॉलॉजी (१०%), गो डिजिट जनरल (७.१२%), आवास फायनांसर (६.७६%), इंटलेक्ट डिझाईन (६.२६%), कल्पतरू प्रोजेक्ट (५.९९%), ईरीस लाईफसायन्स (५.७४%), ब्रेनबीज सोलूशन (५.०६%) समभागात झाली आहे.

Comments
Add Comment