फिलिपाईन्समध्ये बोट बुडून अनेकांचा मृत्यू

झांबोआंगा : फिलिपाईन्समध्ये झांबोआंगा येथून सुलू प्रांतातील जोलो बेटाच्या दिशेने निघालेली बोट समुद्रात बुडाली. बुडालेल्या बोटीत ३५० पेक्षा जास्त नागरिक होते. यातील अनेकांचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. बचाव पथकाने १५ मृतदेह समुद्रातून बाहेर काढले आहेत. अद्याप २८ जण बेपत्ता आहेत. बचाव पथकाने ३१६ जणांना वाचवले आहे.


बुडालेली बोट ही इंटर-आयलंड कार्गो आणि पॅसेंजर सेवा होता. बोटीत ३३२ प्रवासी आणि २७ क्रू मेंबर्स (कर्मचारी) होते. समुद्रातून प्रवास करत असताना बोटीत तांत्रिक बिघाड झाला. या बिघाडामुळे सोमवारी पहाटे बोट समुद्रात बुडाली.


समुद्रात असताना सोमवारी २६ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री एक वाजून ५० मिनिटांनी बोटीकडून एक संकटात सापडल्याचा संदेश पाठवण्यात आला. हा संदेश मिळताच बचाव पथक घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाले. पण पथक पोहोचण्याआधीच बालुक द्वीप गावापासून साधारण २ किलोमीटर अंतरावर बोट बुडाली. वाचलेल्या प्रवाशांना तटरक्षक दलाने तातडीने बालुक द्वीप गावात नेले, तिथेच त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करण्यात आले.


तटरक्षक दलाची टीम तसेच तटरक्षक दलाचे एक विमान, हवाई दलाची आणि नौदलाची टीम हे सर्वजण संयुक्तपणे मदतकार्य करत आहेत. बेपत्ता असलेल्यांचा शोध सुरू आहे. बोट बुडण्याचे कारण अद्याप समजलेले नाही. या प्रकरणी चौकशी होणार आहे.


फिलिपाईन्समध्ये बोट बुडण्याच्या घटना अनेकदा घडतात. फिलिपाईन्सच्या बेटांच्या दरम्यान लहान - मोठी चक्रीवादळे वारंवार येत असतात. या चक्रीवादळांमुळे तसेच जहाजांची योग्य निगा न राखणे, गर्दी आणि सुरक्षा नियमांची कडक अंमलबजावणी न होणे या कारणांमुळेही फिलिपाईन्समध्ये अनेकदा बोटी बुडाल्या आहेत. ताज्या दुर्घटनेचे कारण जाणून घेण्यासाठी चौकशी सुरू आहे.


Comments
Add Comment

Pakistan : इराण-अमेरिका युद्धाचा पाकिस्तानला दणका; इंधनाचे दर भडकल्याने जनता रस्त्यावर, देशात 'एनर्जी लॉकडाऊन'!

इस्लामाबाद : इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे शेजारील देश असलेल्या पाकिस्तानची झोप

Donald Trump : आज रात्री एक संपूर्ण संस्कृती नष्ट होईल...;डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा

वॉशिंग्टन : इराण आणि इस्रायलमधील संघर्ष आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड

America: अमेरिका एफ-१५ पायलटला किती पगार देते? ही रक्कम ऐकून तुम्हाला बसेल धक्का

मुंबई: अमेरिकेने इराणमध्ये अडकलेल्या आपल्या एफ-१५ पायलट्सला वाचवण्यासाठी एक मोहीम सुरू केली. ही मोहीम यशस्वी

David Warner: दारू पिऊन गाडी चालवणे पडले महागात; डेव्हिड वॉर्नरला अटक

नवी दिल्ली: पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज

Israeli Consulate Attack: इस्तंबूलमधील इस्रायली वाणिज्य दूतावासावर हल्ला

नवी दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, तुर्कीमधील इस्तंबूल

Iran-US-Israel War : अमेरिका - इस्रायलकडून इराणच्या १७ निवासी भागांवर बॉम्बहल्ले; विमानतळही उद्ध्वस्त

अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाचा (Iran-US-Israel War) आजचा ३९ वा दिवस आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी