ठाकरे सेनेच्या वागदे ग्रामपंचायत सदस्यासह पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीने बिनविरोध विजयाची मालिका सुरू ठेवली असतानाच, कणकवली मतदारसंघात ठाकरे सेनेला मोठे खिंडार पडत आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या राजकीय हालचालींमुळे ठाकरे गटाला सातत्याने धक्के बसत असून, वैभववाडीनंतर आता कणकवली तालुक्यातील वागदे ग्रामपंचायतीतून मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाले आहेत.


वागदे ग्रामपंचायतीचे ठाकरे गटाचे सदस्य दशरथ गावडे यांच्यासह माजी शाखाप्रमुख रवी गावडे, संतोष घाडीगावकर, मनोज गावडे, शांताराम गावडे, अनंत गावडे, राजू गावडे आदी पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे पालकमंत्री नितेश राणे यांनी भाजपात स्वागत केले.


यावेळी वागदे ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप सावंत, लक्ष्मण घाडीगावकर, समीर प्रभूगावकर, गोविंद घाडीगावकर, भाई काणेकर यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कणकवली मतदारसंघात भाजपाची संघटनात्मक ताकद वाढत असून, ग्रामपंचायत पातळीवरही पक्षाचा प्रभाव वाढताना दिसत आहे.

Comments
Add Comment

Malegaon : मालेगावमध्ये दीड लाखाचे एमडी जप्त

मालेगाव : शहरालगतच्या द्याने रमजानपुरा पोलिसांनी अवैध अमली पदार्थाची विक्री आणि तस्करी करणाऱ्यांवर मोठी

Indian Service Sector : भारतात सेवा क्षेत्रातले ५० टक्के कर्मचारी सतत नव्या नोकरीच्या शोधात

नवी दिल्ली : भारतातील व्यावसायिक सेवा क्षेत्रात ५० टक्के कर्मचारी सतत नव्या नोकरीच्या शोधात असतात. जास्त पगार

INDvsSL : भारताविरुद्धच्या कोलंबो कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका पिछाडीवर

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Healthy Drinks : चहा महागला म्हणून चिंता सोडा! सकाळी चहाऐवजी प्या 'हे' पेय; शरीर होईल डिटॉक्स अन् वजनही घटेल

साखर आणि चहाचे भाव वाढल्याने खिशावर पडणारा ताण कमी करण्यासाठी आणि आरोग्याला उत

Weight Loss Tips : व्यायामाशिवाय वजन कमी करायचंय? मग आहारात ‘या’ पदार्थांचा नक्की करा समावेश

मुंबई : वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबतच आहाराकडे लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. अनेकांना नियमित