अलिबाग : अलिबाग नगर परिषदेतील चार विषय समिती सभापती, तसेच सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मात्र भाजपचे अंकित बंगेरा यांनी चारऐवजी ५ समित्या गठित कराव्यात, पर्यटन ही समिती जी आधी होती, ती घ्यावी अशी सुचना केली होती. मात्र ती मागणी फेटाळण्यात आली. विविध विषय समित्यांमध्ये स्थायी समितीवर नगराध्यक्षा अक्षया प्रशांत नाईक, मानसी संतोष म्हात्रे, प्रशांत मधुसुदन नाईक, अनिल रमेश चोपडा, साक्षी गौतम पाटील, प्रदीप कृष्णाजी नाईक आणि समीर मधुकर ठाकूर यांची निवड झाली.
स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीवर मानसी संतोष म्हात्रे, शैला शेषनाथ भगत, ऋषिकेश रमेश माळी आणि जमालउद्दीन युसुफ सय्यद यांची निवड करण्यात आली. वीज व सार्वजनिक बांधकाम समितीवर प्रशांत नाईक, निलम हजारे आणि योजना पाटील यांची निवड झाली. पाणीपुरवठा व जलनिःसारण समितीवर अनिल चोपडा, वृषाली भगत, संतोष गुरव आणि सागर भगत यांची निवड झाली. महिला व बालकल्याण समितीवर साक्षी पाटील, संध्या पालवणकर, निवेदिता राजेंद्र वाघमारे आणि आनंद अशोक पाटील यांची निवड करण्यात आली आहे. नव्या पदाधिकाऱ्यांच्य माध्यमातून नगर परिषदेच्या कारभाराला गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात येत आहे. स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम, तसेच महिला व बालकल्याण क्षेत्रात नागरिकाभिमुख निर्णय घेत विकासाला चालना देण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला, तसेच विविध समित्यांवर अध्यक्ष, उपाध्यक्ष तथा पदसिद्ध सभापती, सभापती, उपसभापती आणि नामनिर्देशित सदस्य पदांवरही नियुक्त्या करण्यात आल्या असून. समित्यांची अधिकृत रचना निश्चित झाली आहे.