मुंबईत कुस्तीची महादंगल!

चार राज्यातले दिग्गज पैलवान भिडणार


मुंबई : पहिल्यांदाच देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांमधील अव्वल पैलवान एकाच मैदानात आमनेसामने येणार असून, हा थरारक महासंग्राम ‘कुस्ती महादंगल २०२६’ च्या रूपाने साजरा होणार आहे.


अर्जुन पुरस्कार विजेते, ऑलिम्पियन आणि सध्या मुंबई पोलीस दलात उपायुक्त पदावर कार्यरत असलेले नरसिंह यादव यांच्या संकल्पनेतून, नरसिंह फाऊंडेशन आणि नागरिक संरक्षण दल यांच्या संयुक्त विद्यमाने ही भव्य एकदिवसीय कुस्ती स्पर्धा २६ जानेवारीला दुपारी २ ते सायंकाळी ७ या वेळेत विलासराव देशमुख मैदान, लोखंडवाला, कांदिवली (पूर्व), मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.


या स्पर्धेत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाब ही देशातील कुस्तीची बलाढ्य राज्ये सहभागी होत असून प्रत्येक संघातून ५ पुरुष आणि २ महिला असे एकूण ७ पैलवान आपले कसब पणाला लावणार आहेत. विजेत्यांसाठी आकर्षक रोख बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे.


या ऐतिहासिक स्पर्धेला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आमदार अतुल भातखळकर, आशिष शेलार आणि संजय उपाध्याय यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभणार आहे. यावेळी हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी तसेच जागतिक स्तरावर चमकलेल्या कुस्तीपटूंचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.


चार राज्यांची संघ पुढीलप्रमाणे :


मराठा वॉरियर्स (महाराष्ट्र) :
पृथ्वीराज पाटील (महाराष्ट्र केसरी, वर्ल्ड मेडलिस्ट),
रविराज चव्हाण, आदर्श पाटील, सोनबा गोंगाणे, अक्षय ढेरे.
महिला : अमृता पुजारी, सोनाली महाडिक


शेर-ए-पंजाब (पंजाब):
करणदीप (पंजाब केसरी), संदीप माने, रोहित प्रजापत, उदय शर्मा, अभिषेक यादव.
महिला : प्रियंका सिकरवार, शिवानी


हरियाणा शूर (हरियाणा):
अंकुश, अमित, निवान, आकाश, सागर.
महिला : कुसुम दहिया, मोनी गुर्जर.


यूपी योद्धा (उत्तर प्रदेश):
अभिनायक सिंह (यूपी केसरी), मुलायम यादव, तेजवीर यादव, आयुष चौधरी, विशाल सहानी.
महिला : प्रियंका सिकरवार, फ्रीडम यादव.

Comments
Add Comment

आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी-२० विश्वचषकातून पत्ता कट, स्कॉटलंडचा प्रवेश

मुंबई  : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अखेर बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या आडमुठ्या भूमिकेवर कठोर कारवाई केली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा मुंबई (प्रतिनिधी) : महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा संपल्यानंतर भारतीय महिला संघ

T20I : गुवाहाटीत रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत, भारताला मालिका जिंकण्याची संधी

गुवाहाटी  : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा महत्त्वपूर्ण सामना रविवारी

न्यूझीलंडविरुद्धच्या रायपूर टी २० मध्ये भारताचा विजय, मालिकेत २-० अशी आघाडी

रायपूर : भारताने न्यूझीलंडविरुद्धची रायपूरमधील टी २० मॅच सात विकेट राखून जिंकली. या विजयासह भारताने पाच मॅचच्या

ग्रँड स्लॅम ४०० व्या विजयाच्या उंबरठ्यावर नोव्हाक जोकोविच!

ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश मेलबर्न : टेनिस जगतातील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या नोव्हाक

भारताचे विजयी आघाडीकडे लक्ष्य

रायपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध आज दुसरी टी-२० लढत रायपूर : नागपूरमध्ये मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर, भारतीय