प्रतिनिधी:आता सर्वसामान्य व वेतनधारकांसाठी मोठी बातमी आहे. ईपीएफओ (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना Employees' Provident Fund Organisation) संस्था आपल्या कार्यशैलीत मोठ्या प्रमाणात बदल करू शकते अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. आता ईपीएफओ सदस्यांना बँकिग सुविधेप्रमाणेच भविष्य निर्वाह निधीचे पैसै थेट युपीआय (Unified Payments Interface) माध्यमातून काढता येऊ शकतात. यूपीआयद्वारे पैसे काढणे, सोप्या श्रेणी (Category) आणि जलद पैसे प्रदान करण्यासाठी या सुविधेचा फायदा होईल. या सुविधेमुळे सदस्यांना निधी जलद गतीने मिळण्याची शक्यता आहे आणि एटीएम प्रक्रियेद्वारे पैसे काढणे देखील शक्य होऊ शकते. आधीच्या ईपीएफओ २.० पेक्षा यावेळी मोठे तांत्रिक बदल करण्याच्या संस्था तयारीत असून तांत्रिकच नव्हे तर संकल्पनात्मक अनेक मोठे बदल केले जाणार आहे. कमीतकमी कागदी नियमांची पूर्तता, जास्तीत जास्त पारदर्शकता अवलंबून ही प्रकिया अधिक सोपी करण्याचा निर्णय प्रस्तावित केला जात आहे. अद्याप याला अंतिम मोहोर मिळाली नसली तरी हे संकेत दिले गेले आहेत. ईपीएफओ ३.० अंतर्गत, सदस्यांना आता समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांच्या 'जोडलेल्या' प्रादेशिक ईपीएफओ कार्यालयापुरते मर्यादित राहावे लागणार नाही.ते कुठल्याही नजीकच्या कार्यालयातून समस्यांचे निराकरण करु शकणार आहेत. तसेच नव्या बदलानुसार,नवीन वेबसाइटमध्ये एआय आधारित भाषांतरांचा समावेश करणे अपेक्षित आहे, ज्यामुळे युजर्सना त्यांच्या भाषेत इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी, मराठी, तमिळ आणि इतर अनेक भारतीय भाषांमध्ये माहिती मिळू शकेल.
सुधारणा कागदपत्रांची प्रक्रिया कमी करण्यासाठी, चुका कमी करण्यासाठी आणि ईपीएफओचे कामकाज बँकिग प्रमाणेच करून नव्या फिचर्ससाठी तयार करण्यात आले आहेत. विशेष यूपीआय वापरून पीएफ काढण्याची प्रस्तावित सुविधा असून आता भीम (BHIM) ॲपचाही त्यात समावेश आहे असा प्रस्ताव सादर केला गेला आहे. एप्रिल २०२६ पर्यंत सुरू होण्याची या नियमाची अंमलबजावणी सुरू होईल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे देशभरातील कुठल्याही कार्यालयात ही नवीन प्रणाली सेवा मिळवणे अधिक सोपी होणार आहे.तसेच एकदा अंमलबजावणी झाल्यावर, कर्मचारी देशातील कोणत्याही ईपीएफओ कार्यालयातून पीएफ-संबंधित कामे करू शकणार आहेत, ज्यामुळे फिरतीची नोकरी असलेल्यांना या सुविधेचा लाभ होणार आहे.ईपीएफओ पोर्टलला अधिक सोपे आणि कार्यक्षम बनवण्यासाठी त्यांचेही अपडेट केले जाणार आहे.
ईपीएफओने पैसे काढण्याचे नियमही सोपे केले आहेत. पूर्वी, पीएफ काढणे १३ वेगवेगळ्या कारणांद्वारे नियंत्रित केले जात होते, ज्यामुळे सदस्यांमध्ये गोंधळ निर्माण होत असे. आता, पैसे काढण्याचे फक्त तीन श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. ज्यात आवश्यक गरजा (गंभीर आजार, शिक्षण, विवाह) घराच्या गरजा (घर खरेदी, बांधकाम, गृहकर्ज परतफेड), विशेष परिस्थिती (बेरोजगारी) यांचा समावेश असेल. आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे सर्व श्रेणींमध्ये १२ महिन्यांच्या सेवेची एकसमान अट. सुधारित रचनेनुसार, शिक्षणासाठी पैसे काढण्याची परवानगी १० वेळा आणि विवाहासाठी ५ वेळा दिली जाऊ शकते. या सुधारणांमध्ये असाही प्रस्ताव आहे की सदस्य ७५% निधी त्वरित काढू शकतात, तर उर्वरित २५% रक्कम खात्यात राहील जेणेकरून व्याजाचे फायदे आणि सेवानिवृत्तीची सुरक्षा अबाधित राहील. जर एखादा सदस्य वर्षभर बेरोजगार राहिला, तर त्याला पीएफमधील १००% रक्कम काढण्याची परवानगी दिली जाऊ शकते. याव्यतिरिक्त, ईपीएफओने सदस्यांना नाव, जन्मतारीख, पालकांची नावे आणि नोकरीच्या तारखांसारख्या सामान्य प्रोफाइलमधील चुका ऑनलाइन दुरुस्त करण्याची सुविधा दिली आहे, ज्यासाठी आता नियोक्ता किंवा ईपीएफओच्या मंजुरीची आवश्यकता नाही.