महापौरपदासाठी आकड्यांचा खेळ!

निकालानंतर युती - आघाड्यांचा नगरसेवकांना विसर


मुंबई : राज्यातील २९ महापालिकेतील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत काढल्यानंतर, महापौरपदावर आपल्या पक्षाची वर्णी लागताच, विरोधी पक्षांतील तसेच अपक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न पडद्यामागून त्या त्या महापालिकेत अधिक संख्याबळ असलेल्या पक्षांकडून केले जात आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेत एकमेकांच्या विरोधात लढणाऱ्या मनसेने शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्यानंतर, सत्ताधारी आणि विरोधकांनी नगरसेवक कधी कुठे जाईल, याची खात्री संबंधित पक्षांच्या नेत्यांनाही नसल्याने महापौरपदाच्या निवडीवरून राज्यातील अनेक महापालिकांमध्ये तर्कवितर्क लढविले जात आहेत. जनतेच्या समोर युती - आघाड्या म्हणून सामोरे गेल्यानंतरही, निकालानंतर आपल्याच मित्र पक्षांचा नगरसेवकांना विसर पडला असून, प्रबळ संख्याबळ असलेल्या पक्षांकडून स्वत:च्या ताकदीवर जादूई आकडा गाठण्यासाठी आकड्यांची जुळवाजुळव होताना दिसत आहे.


अमरावती महापालिकेत संख्याबळानुसार भाजप महापौर पदासाठी दावा करणार असला तरी बसपच्या तीन नगरसेवकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणारी आहे. एकाही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी ४४ ही आकडेवारी जुळविण्यासाठी आता नेत्यांची दमछाक होत आहे. पद आणि अन्य मागण्या पूर्ण कशा कराव्या यातच चर्चेच्या फेऱ्या आटोपत असून, ठोस निर्णय अद्यापही झालेला नाही. तसेच भाजप महापौर पदासाठी कुणाचे नाव निश्चित करतो, यावरही बरेच काही अवलंबून आहे. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचीसुद्धा तितकीच भूमिका महत्त्वाची ठरणारी आहे. किंबहुना कोणता पक्ष कोणाशी आघाडी, युती करणार यावरच महापौरपदाचे गणित जुळणार आहे.


चंद्रपूर महापालिकेत जो पक्ष आम्हाला महापौरपद देईल, त्यांच्यासोबत आम्ही जाऊ, असे उबाठा सेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिरे यांनी भूमिका घेतल्यामुळे काँग्रेसपुढे पेच निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडट्टीवार यांच्यात झालेल्या वादानंतर अडीच वर्षे महापौर आपल्या गटाचा असेल असा फॉर्म्युला ठरविला असला तरी, उबाठाच्या पाठिंबावर काँग्रेसला जादूई आकडा गाठता येणार असल्याने, उबाठाचा भाव
वधारला आहे.


भिवंडी-निजामपूर महापालिकेत भाजपचे माजी खासदार कपिल पाटील चावी फिरवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या हाता-तोंडाशी आलेले महापौरपद थोडक्यात हुकण्याची शक्यता आहे. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने महापालिकेत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment

प्रभाकर शिंदे ‘स्थायी’, तर खणकर सभागृह नेता?

मुंबई : मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेना महायुतीचा महापौर बसणार हे आता जवळपास निश्चित झाले असून तसे झाल्यास सभागृह

एमपीएड, एमएड सीईटीच्या प्रवेश नोंदणीला १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) घेण्यात येणाऱ्या मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन (एमपीएड)

डांबराच्या भट्टीकडे पालिकेचे दुर्लक्ष

विषारी धुरामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास कांदिवली : कांदिवली पश्चिम येथील म्हाडा वसाहत एकतानगर, सुंदर नगर,

दावोसमध्ये महाराष्ट्राचे ३० लाख कोटींचे सामंजस्य करार

४० लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट मुंबई : दावोसमध्ये आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने ३० लाख

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्यभरात समाजोपयोगी उपक्रम

शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा ‘आरोग्य आपल्या दारी’, गडकोट स्वच्छता, मराठी भाषा

Mega Block Update : मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना; येत्या रविवारी मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. येत्या रविवारी, २५ जानेवारी रोजी मध्य रेल्वे, हार्बर