Chhattisgarh Bridge Stolen : छत्तीसगडमध्ये मध्य रात्री कॅनलवर बनलेला स्टीलचा पुल चोरीला, चोरांची अनोखी चोरी..!

छत्तीसगड : छत्तीसगडमध्ये कोरबा शहरात एक विचीत्र चोरीची घटना समोर आली आहे. छत्तीसगड येथे हसदेव लेफ्ट कॅनालवर बांधलेला,सुमारे ४० वर्षे जुना आणि अंदाजे १० टन वजनाचा स्टील पूल रातोरात लंपास केला. हा पूल ढोडीपारा परिसरा मध्ये असून, तो प्रामुख्याने पादचाऱ्यांसाठी वापर केला जात होता.



१८ जानेवारी रोजी तिथे राहत असलेल्या नागरिकांच्या लक्षात आले की पूल अचानक गायब झाला आहे. या घटने नंतर तेथील भागाचे नगरसेवक लक्ष्मण श्रीवास यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना आढळले की चोरट्यांनी गॅस कटरच्या मदतीने पुलाचे लोखंडी रेलिंग आणि संपूर्ण रचना कापून वेगवेगळ्या भागांत विभागली आणि भंगार म्हणून विक्री करण्याच्या उद्देशाने चोरी केली. कोरबाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक लखन पाटले यांनी सांगितले की, तपासासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. तांत्रिक तपास, गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि कसून चौकशीनंतर या गुन्ह्यात सुमारे १५ जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत लोचन केवट, जयसिंह राजपूत, मोती प्रजापती, सुमित साहू आणि केशवपुरी गोस्वामी उर्फ ‘पिक्चर’ या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.



चौकशीत आरोपींनी पुलातील लोखंड स्क्रॅपमध्ये विकण्याचा कबुलीजबाब दिला आहे. मुख्य आरोपी मुकेश साहू आणि असलम खान यांच्यासह इतर १० आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी चोरीतील सुमारे सात टन स्टील नहरातून जप्त केले असून, चोरीसाठी वापरलेले वाहनही ताब्यात घेतले आहे. उर्वरित स्टील कुठे विकले गेले, याचा तपास सुरू आहे. पूल चोरी झाल्यानंतर स्थानिक नागरिकांना नहर ओलांडण्यासाठी जवळील काँक्रीट पुलाचा वापर करावा लागत आहे.

Comments
Add Comment

Kargil Vijay Diwas : कारगिल ते ऑपरेशन सिंदूर! २७ वर्षांत भारतीय सैन्याची युद्धनीती कशी बदलली?

नवी दिल्ली : २६ जुलै हा दिवस भारतासाठी अभिमानाचा मानला जातो. याच दिवशी १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धात (Kargil War)

Delhi Protest : तब्बल ३६ दिवसांनंतर जंतर-मंतर आंदोलन संपलं; रातोरात धुऊन स्वच्छ करण्यात आलं आंदोलनस्थळ

नवी दिल्ली : तब्बल ३६ दिवस घोषणाबाजी (Sloganeering), आंदोलन (Protest) आणि विद्यार्थ्यांच्या (Students) गर्दीने गजबजलेलं जंतर-मंतर (Jantar

Paper Leaks : पेपर लीकवर केंद्राचा मोठा प्रहार! दोषींना १० वर्षांपर्यंत तुरुंगवास, ₹१० कोटींपर्यंत दंड; संसदेत सोमवारी विधेयक

नवी दिल्ली : देशभरात पेपर लीकच्या वाढत्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाच्या

Narendra Modi : पंतप्रधान 26 जुलैला विकसित व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम मधील सहभागींशी साधणार संवाद

पंतप्रधान 26 जुलैला विकसित व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम मधील सहभागींशी साधणार संवाद नवी दिल्ली : पंतप्रधान

Prataprao Jadhav : श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त ₹150 चे स्मृती नाणे व टपाल तिकीट जारी करण्याची केंद्राकडे मागणी

नवी दिल्ली : केंद्रीय आयुष मंत्रालय (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव

Weather Warning : पुढील १२ तासांत देशातील १८ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाचा तडाखा; वाऱ्याचा वेग ताशी ८० किमीपर्यंत पोहोचण्याची शक्यता

नवी दिल्ली: देशभरात मान्सूनचा जोर दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) देशातील