महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत हवामानाचा बदल; ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज, बळीराजा चिंतेत

मुंबई : देशाच्या विविध भागांमध्ये सध्या हवामानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वातावरणात आर्द्रता वाढली असून, त्याचे अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्रात जाणवू लागले आहेत. पुढील काही दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगांची दाटी आणि हलक्या सरींची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.


गेल्या दोन ते तीन दिवसांत राज्यातील थंडीचा जोर कमी झाला असून, किमान आणि कमाल तापमानात वाढ नोंदवली जात आहे. सकाळच्या वेळेस काही भागांत धुक्याची शक्यता असून, दिवसभर उष्णता जाणवण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या हवामान बदलामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.


हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, उत्तर भारतात सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे थंड वाऱ्यांचा प्रवाह वाढला आहे, तर दुसरीकडे समुद्राकडून येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे वातावरणात अस्थिरता निर्माण झाली आहे. परिणामी, दिवस आणि रात्रीच्या तापमानात मोठा फरक जाणवत असून वाऱ्याचा वेगही मध्यम स्वरूपाचा राहण्याची शक्यता आहे.


भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पालघर, अहिल्यानगर आणि आसपासच्या भागांत पुढील काही दिवस ढगाळ हवामान राहणार आहे. काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या काळात कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याचा अंदाज आहे.


या बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ढगाळ वातावरण आणि आर्द्रतेमुळे तूर, हरभरा, ज्वारी, मका तसेच कापूस पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच आंबा आणि काजूच्या मोहोरालाही धोका निर्माण झाला आहे.


दरम्यान, हवामान विभागाने शेतकऱ्यांना पुढील काही दिवस सतर्क राहण्याचा सल्ला दिला असून, पिकांच्या संरक्षणासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २६ जानेवारीपर्यंत ही स्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘बीग्सी’ अभिनव, खर्चमुक्त उपक्रम

मुंबई : महिला प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत गृह विभाग तसेच परिवहन विभागाच्या सहकार्याने

मुंबईच्या नव्या महापौरांच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे राणीबागेतला महापौर बंगला

मुंबई : मुंबई महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. मुंबई महापालिकेत भाजपा

मुंबईत मंगळवारपासून पुढील सात दिवस शहर आणि पूर्व उपनगरात १० टक्के पाणीकपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱया पिसे येथील ‘न्यूमॅटिक गेट सिस्टिम’च्या

Mahalakshmi Bridge : रेल्वे रुळांवरून धावणार पालिकेचा पहिला 'केबल-स्टेड' पूल; ५५% काम फत्ते; सात रस्ता, महालक्ष्मी...अजून कुठे कुठे? पाहा नेमका मार्ग

मुंबई : दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक सुलभ करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे

मध्य रेल्वेद्वारा मुंबई–नागपूर / मडगाव दरम्यान ४ विशेष रेल्वे सेवा

मुंबई  : रेल्वे प्रवासाच्या वाढत्या मागणीचा विचार करता, मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई –

पश्चिम रेल्वेचे दोन गाड्यांच्या टर्मिनल आणि डब्यांच्या रचनेत तात्पुरते बदल

मुंबई कर्णावती एक्सप्रेस वांद्रे टर्मिनस येथून आणि वंदे भारत एक्सप्रेस २० डब्यांच्या रेकसह धावणार मुंबई  : २२