कल्याण–डोंबिवलीत मंगळवारी पाणीपुरवठा बंद

कल्याण :कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रांवरील विद्युत व यांत्रिकी उपकरणांची देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामांसाठी मंगळवार, २७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत (८ तास) पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कालावधीत कल्याण (पूर्व व पश्चिम), डोंबिवली (पूर्व व पश्चिम) तसेच कल्याण ग्रामीण विभागातील मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी आणि इतर परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. तरी संबंधित परिसरातील नागरिकांनी आधीच पाण्याचा पुरेसा साठा करून घ्यावा आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा विभाग) यांच्याकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

भय आणि भ्रमाच्या विळख्यातला थरार ‘सालबर्डी’

मुंबई : इतिहासाच्या गर्भात दडलेल्या अनेक रहस्यांचा कधीच शोध लागत नाही, ती नेहमीच अनुत्तरीतच रहातात. काहींचा शोध

अहमदाबादमध्ये दुर्दैवी घटना; पतीने चुकून झाडली पत्नीवर गोळी अन्....

अहमदाबाद : गुजरातची राजधानी अहमदाबाद येथे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. परवानाधारक

वसंत पंचमी २०२६ : ज्ञान, कला आणि नव्या सुरुवातीचा शुभ दिवस; जाणून घ्या सरस्वती पूजनाची परंपरा आणि महत्त्व

मुंबई : माघ महिन्यातील शुक्ल पंचमीला साजरी होणारी वसंत पंचमी हा हिंदू धर्मातील विशेष मानाचा दिवस मानला जातो.

मध्य रेल्वेद्वारा मुंबई–नागपूर / मडगाव दरम्यान ४ विशेष रेल्वे सेवा

मुंबई  : रेल्वे प्रवासाच्या वाढत्या मागणीचा विचार करता, मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई –

तंत्रज्ञानाच्या जोरावर चार राज्यांत शोधमोहीम; ४ राज्ये , ३० टोलनाके, ३०० सीसीटीव्ही पालथे घालत वर्धा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

वर्धा : जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या १० चाकी ट्रकचा शोध घेण्यासाठी वर्धा पोलिसांनी केलेली तपासमोहीम सध्या

बार्ट्रॉनिक्स लिमिटेड एस एन एन कंपनीचे अधिग्रहण करणार

मोहित सोमण: बार्ट्रॉनिक्स लिमिटेड (Bartronics Limited) कंपनीने आज एक्सचेंज फायलिंगमध्ये एसएनएन (Shree Naga Narasimha Private Limited SNN) कंपनीचे