कल्याण :कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रांवरील विद्युत व यांत्रिकी उपकरणांची देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामांसाठी मंगळवार, २७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत (८ तास) पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कालावधीत कल्याण (पूर्व व पश्चिम), डोंबिवली (पूर्व व पश्चिम) तसेच कल्याण ग्रामीण विभागातील मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी आणि इतर परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. तरी संबंधित परिसरातील नागरिकांनी आधीच पाण्याचा पुरेसा साठा करून घ्यावा आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा विभाग) यांच्याकडून करण्यात आले आहे.






