डॉलरच्या तुलनेत रूपया ९२ रूपयावर! आतापर्यंतची निचांकी कामगिरी का घसरतोय रूपया? वाचा

मोहित सोमण: जगभरातील अस्थिरता आजच्या दिवशी कमी होत असली तरी जागतिक पटलावर रूपयाची स्थिती डळमळीत झाली आहे. आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची विनियम मूल्यात अभूतपूर्व घसरण झाली. त्यामुळे रूपया नव्या ऐतिहासिक घसरणीकडे पोहोचला. आज दिवसभरात रूपयाने डॉलरच्या तुलनेत ९१.९९ मूल्य नोंदवले आहे. त्यामुळे रूपया डॉलर तुलनेत जवळपास ९२ रूपयांवर पोहोचला आहे. दुपारी ३.१३ वाजेपर्यंत रूपया ९१.९६ पातळीवर व्यवहार करत आहे. गेल्या दोन दिवसात रूपयात मोठी घसरण झाल्याने जवळपास १ रूपयाने इंट्राडे पातळीवर कोसळला आहे. युएस ग्रीनलँड वादाच्या पार्श्वभूमीवर डॉलरच्या निर्देशांकात कमालीची अस्थिरता असताना दुसरीकडे यील्डमध्ये वाढ होत असतानाच डॉलर निर्देशांक जगभरातील स्थितीत तुलनेने कमी असला तरी रूपयांच्या तुलनेत तो चढाच राहिलेला आहे. परिणामी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे महत्व कमी होत असल्याने आरबीआयच्या ओपन मार्केट ऑपरेशननंतरही घरगुती स्थितीमुळे रूपया कमकुवत राहत आहे.


आज सकाळी एक्सचेंजमध्ये (आंतर बँकिंग परकीय चलन बाजारात) रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ९१.४५ वर उघडला होता. सुरुवातीच्या व्यवहारात रूपयाने ९१.४१ चा उच्चांक गाठला असला तरी परंतु लवकरच ही वाढ गमावली आणि ९१.९९ च्या विक्रमी नीचांकी पातळीवर रूपया पोहोचला, ज्यामुळे मागील बंद भावाच्या तुलनेत ४१ पैशांची घसरण नोंदवली गेली असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले. त्यामुळे एकूणच रूपयात कमालीची अस्थिरता दिसली. एकीकडे भारत युएस यांच्यातील द्विपक्षीय करारावर तोडगा न निघाल्यानंतर विनिमय मूल्यात रूपया सातत्याने घसरताना बाजाराने पाहिला. आज तरीही दुपारपर्यंत युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणवरील नव्या वक्तव्यानंतर बाजारात अस्थिरता वाढली. दरम्यान प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार फॉरेक्स व्यापाऱ्यांनी सांगितले की, आरबीआय हस्तक्षेप काही प्रमाणात अस्थिरता कमी करण्यास मदत करत असली तरी देशांतर्गत चलनासाठी असलेला एकूण नकारात्मक कल तो बदलू शकत नाही.


याशिवाय चलनासाठी अमेरिकेसोबतचा प्रलंबित व्यापार करार हा एक महत्त्वाचा स्थिरीकरण घटक आहे असेही तज्ञांनी यावेळी म्हटले. जोपर्यंत भूराजकीय धोका कमी होत नाही आणि व्यापार करार प्रत्यक्षात येत नाही तोपर्यंत रुपया बाह्य धक्क्यांप्रति असुरक्षित राहण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी आपल्या निरिक्षणात नोंदवले आहे. गुरुवारी रुपया आपल्या सार्वकालिक नीचांकी पातळीवरून सावरला आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ७ पैशांच्या वाढीसह ९१.५८ वर बंद झाला होता. दरम्यान सहा चलनांच्या बास्केटच्या तुलनेत डॉलरची ताकद मोजणारा डॉलर निर्देशांक ०.०३% वाढून ९८.३८ वर सकाळी व्यवहार करत होता. जागतिक तेल बेंचमार्क असलेल्या ब्रेंट क्रूडचा वायदा बाजारात भाव १.०९% वाढून प्रति बॅरल ६४.७६ डॉलरवर व्यवहार करत होता. देशांतर्गत शेअर बाजारात, सेन्सेक्स ७९७.९४ अंकांनी घसरून ८१५०९.४३ वर तर निफ्टी २४०.५५ अंकांनी घसरून २५०४९.३५ वर बंद झाला होता. एक्सचेंजच्या प्रोविजनल आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी गुरुवारी २५४९.८० कोटी रुपयांचे शेअर्स विकले.

Comments
Add Comment

कठुआमध्ये जैशचा दहशतवादी ठार

कठुआ : जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत जैशचा एक दहशतवादी ठार झाला. जम्मूचे आयजीपी

विकसित भारताच्या उभारणीसाठी संपूर्ण देश एकजूट: पंतप्रधान

तिरुवनंतपुरम : विकसित भारत घडवण्यासाठी आज संपूर्ण देश एकजुटीने प्रयत्न करत आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्येही 'स्वीकृत सदस्य' ?

मुंबई : महानगरपालिका आणि नगरपालिकांप्रमाणेच आता जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्येही 'स्वीकृत सदस्य'

पश्चिम बंगालमध्ये एसआयआर सुनावणी शिबिरावर हल्ला

जिवाच्या भीतीने सुनावणी सोडून पळाले अधिकारी दिनाजपूर : पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील

भीम ॲपवर मागील वर्षी मासिक व्यवहारांमध्ये चौपट वाढ

मुंबई : २०२५ हे वर्ष भारतातील डिजिटल पेमेंट्ससाठी मैलाचा दगड ठरले असून, भीम पेमेंट्स ॲपने यावर्षी वापरात

महाराष्ट्र सदन घोटाळ्यात ईडीकडूनही भुजबळांची निर्दोष मुक्तता

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यासाठी आजचा दिवस दिलासादायक ठरला. गेल्या अनेक वर्षांपासून