Friday, January 23, 2026

बाजारात किरकोळ घसरण आज गुंतवणूकदारांनी निवडक शिस्तबद्ध गुंतवणूक का करावी? वाचा आजची टेक्निकल पोझिशन

बाजारात किरकोळ घसरण आज गुंतवणूकदारांनी निवडक शिस्तबद्ध गुंतवणूक का करावी? वाचा आजची टेक्निकल पोझिशन

मोहित सोमण: सकाळच्या सत्रात आज पुन्हा एकदा किरकोळ घसरणीकडे कौल गेला असल्याचे स्पष्ट होते. कालच्या बाजारातील वाढीनंतर पुन्हा एकदा शेअर बाजारात विवेचना चालू झाल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात किरकोळ घसरण झाल्याने सेन्सेक्स ७८ व निफ्टी १० अंकाने घसरला आहे. प्रामुख्याने बँक निर्देशांकात कालच्या वाढीनंतर आज पुन्हा एकदा संमिश्र तिमाही निकालामुळे घसरण झाली असून वैश्विक स्तरावर विशेष असा ट्रिगर गुंतवणूकदारांसाठी नाही. आगामी वैश्विक घडामोडीसाठी गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगल्याने शेअर बाजारात सपाट अथवा किरकोळ घसरणीकडे कौल दिसतो. व्यापक निर्देशांकात सकाळच्या सत्रात मिड कॅप शेअर्समध्ये वाढ झाली असून स्मॉल कॅप शेअर्समध्ये घसरण झालेली दिसते तसेच इतर निफ्टी १००, निफ्टी २००, मिडकॅप ५०, मिडकॅप १०० निर्देशांकात वाढ झाली असून नेक्स्ट ५०, स्मॉलकॅप २५० शेअर्समध्ये घसरण झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ मेटल, हेल्थकेअर, आयटी निर्देशांकात झाली असून सर्वाधिक घसरण मिडिया, रिअल्टी, पीएसयु बँक निर्देशांकात झाली आहे.

आशियाई बाजारातील सुरूवातीच्या कलात बहुतांश निर्देशांकात तेजी दिसत आहे. कालच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या सबुरीने दिलेल्या विधानानंतर शेअर बाजारात उत्सुकता होती. जपानच्या आकडेवारीत घसरण झाली असली तरी व्याजदर स्थिर ठेवल्याने गुंतवणूकदारांनी आशियाई बाजारात तेजीचा कौल दिला आहे. दुसरीकडे काल युएसमधील तिन्ही बाजार तेजीने बंद झाले. त्यामुळे निश्चितच सकारात्मक असली तरी नवा ट्रिगर नसल्याने बाजारात फार अस्थिरता अपेक्षित नाही.

सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ आदित्य एएमसी (५.६५%), होम फर्स्ट फायनान्स (४.७१%), इ क्लर्क सर्विसेस (४.४९%), लीला पॅलेस हॉटेल (४.०९%), एचडीएफसी एएमसी (३.५६%), ज्योती लॅब्स (३.२६%), हिंदुस्थान झिंक (३.२५%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण सिंजेन इंटरनॅशनल (४.३४%), केएसबी (४.०६%), दीपक फर्टिलायझर (२.३०%), सुप्रीम इंडस्ट्रीज (१.९४%), फिनोलेक्स इंडस्ट्रीज (१.८३%) समभागात झाली आहे.

आजच्या बाजार पूर्व परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,'२०२५ मध्ये बाजाराच्या ट्रेंडवर वर्चस्व गाजवलेला परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची (FII) सततची विक्री आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांची (DII) खरेदी यांचा पॅटर्न २०२६ मध्येही आतापर्यंत सुरू आहे. FIIs देखील खरेदीदार बनल्यास हा पॅटर्न बदलेल का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे जो गुंतवणूकदार काही काळापासून विचारत आहेत. १ फेब्रुवारी रोजी सादर होणारे बजेट, त्यात काही बाजारपूरक प्रस्ताव असल्यास, काही प्रमाणात यावर प्रकाश टाकेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भारताच्या कॉर्पोरेट कमाईतील ट्रेंडनुसार FIIs ची भारताप्रती भूमिका निश्चित होईल. केवळ उच्च कमाई वाढच FIIs द्वारे सातत्यपूर्ण खरेदी सुनिश्चित करू शकते, कारण त्यांच्याकडे इतर बाजारांमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय आहे, जिथे मूल्यांकन स्वस्त आहे आणि कमाई अधिक चांगली आहे. कमाईतील वाढ होण्यास अजून वेळ असल्याने आणि FIIs ची विक्रीची रणनीती सुरू राहण्याची अपेक्षा असल्याने, कोणत्याही चांगल्या तेजीला वाव मिळत नाही आणि बाजार मोठ्या प्रमाणात नेट शॉर्ट आहे. काही सकारात्मक बातम्यांमुळे आलेल्या प्रत्येक तेजीच्या वेळी FIIs शॉर्ट पोझिशन्समध्ये वाढ करत आहेत. व्यापक बाजारात, जिथे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FIIs) ची उपस्थिती मर्यादित आहे, तिथे तिसऱ्या तिमाहीच्या निकालांच्या प्रतिसादात हालचाल होण्याची शक्यता आहे.'

गुंतवणूकदारांसाठी आजची टेक्निकल पोझिशन जाणून घ्या-

चॉईस इक्विटी ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेडचे रिसर्च विश्लेषक हितेश टेलर -

२३ जानेवारी रोजी भारतीय इक्विटी बाजार सपाट ते किंचित नकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे, ज्यात गिफ्ट निफ्टी सुमारे २५३३८ च्या पातळीवर म्हणजेच जवळपास ११ अंकांनी खाली, सुरु होण्याचे संकेत मिळत आहेत. अल्प-मुदतीची बाजारातील भावना सावध असली तरी अंतर्गत देशांतर्गत तांत्रिक निर्देशक काही प्रमाणात आधार देत आहेत. तथापि, बाजाराची व्यापक दिशा जागतिक इक्विटी संकेतक, कच्च्या तेलाच्या किमतींमधील चढउतार आणि संस्थात्मक निधी प्रवाहातील ट्रेंडमुळे प्रभावित होण्याची शक्यता आहे. मागील सत्रात निफ्टी ५० मजबूत पातळीवर उघडला आणि २५४३५ पातळीच्या इंट्राडे उच्चांकाला पोहोचला, परंतु उच्च पातळीवर विक्रीच्या दबावामुळे तो उच्च स्तर टिकवून ठेवू शकला नाही. निर्देशांक २५३०० पातळीच्या सपोर्ट पातळीच्या खाली घसरला, २५१६८ पातळीच्या इंट्राडे नीचांकाला पोहोचला आणि अखेरीस २५२८९.९० पातळीवर बंद झाला, ज्यामुळे उच्च स्तरांवर खरेदीचा पाठिंबा कमकुवत असल्याचे दिसून आले. तथापि, निफ्टीने त्याच्या २००-दिवसांच्या DEMA (Daily Exponential Moving Average) पातळीच्यावर टिकून राहण्यात यश मिळवले, जे अंतर्गत आधारावर प्रकाश टाकते. तात्काळ प्रतिकार पातळी (Resistance Level) २५४००–२५४५० पातळीच्या झोनमध्ये आहे, तर मुख्य सपोर्ट २५१००–२५१५० पातळीवर दिसत आहे. ३३.८२ वर असलेला दैनिक आर एस आय (Relatively Strength Index RSI) RSI सतत वरच्या दिशेने जात आहे, जो ओव्हरसोल्ड क्षेत्रात असूनही गतीमध्ये किंचित सुधारणा दर्शवितो.बँक निफ्टी देखील मजबूत पातळीवर उघडला आणि जवळपास ८५० अंकांनी वाढून ५९५७३.१० पातळीच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला, त्यानंतर नफावसुलीमुळे निर्देशांक ५९००० पातळीच्या खाली घसरून ५८८२३ पातळीच्या इंट्राडे नीचांकावर आला. नंतर निर्देशांकाने सावरत ५९२०० पातळीवर बंद दिला, जे घसरणीच्या वेळी खरेदीची आवड आणि सकारात्मक एकत्रीकरणाचा टप्पा दर्शवते. निर्देशांकासाठी प्रतिकार पातळी ५९५००–५९६०० पातळीवर आहे, तर मुख्य सपोर्ट ५८९००–५९००० वर आहे. ४७ वर असलेला दैनिक आर एस आय (RSI) वाढत आहे, जो गतीमध्ये सुधारणा दर्शवितो, तथापि, नवीन पोझिशन्स घेण्यापूर्वी व्यापाऱ्यांना निर्णायक ब्रेकआउटची वाट पाहण्याचा सल्ला दिला जातो.

२२ जानेवारी रोजी, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार इक्विटी बाजारात निव्वळ विक्रेते होते, त्यांनी अंदाजे २५४९ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. याउलट, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी खरेदी करून जोरदार पाठिंबा दिला. सुमारे ४२२२ कोटी रुपयांचे इक्विटी शेअर्स होते. सततच्या जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, व्यापाऱ्यांना बाजारातील घसरणीच्या काळात मूलभूतपणे मजबूत असलेल्या शेअर्सवर लक्ष केंद्रित करून, निवडक आणि शिस्तबद्ध राहण्याचा सल्ला दिला जातो. निफ्टीमध्ये २५७०० पातळीच्या पातळीच्या वर निश्चित आणि टिकून राहिलेला ब्रेकआउट झाल्यानंतरच नवीन लाँग पोझिशन्सचा विचार केला पाहिजे.'

Comments
Add Comment