सकाळी स्थिरता दुपारी धुवा धुवा! आठवड्याची अखेर मोठ्या घसरणीने 'या' प्रमुख कारणांचा गुंतवणूकदारांना फटका,सेन्सेक्स ७६९.६७ व निफ्टी २४१.२५ अंकाने कोसळला

मोहित सोमण: जागतिक स्थितीत पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणवरील विधानामुळे खळबळ माजली आहे. आणखी अस्थिरतेत वाढ झाल्याने सकाळची स्थिरता नकारात्मक स्थितीत बदलली. गुंतवणूकदारांनी आज सावधगिरीची भूमिका बाळगत नफा बुकिंग वाढवल्याने व परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक रूपयांच्या निचांकी पातळीमुळे काढून घेतल्याने शेअर बाजारात धुव्वा उडाला. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात सेन्सेक्स ७६९.६७ अंकांने घसरत ८१५३७.७० व निफ्टी २४१.२५ अंकाने घसरत २५०४८.६५ पातळीवर स्थिरावला आहे. याशिवाय कमोडिटी बाजारातही तुफान वाढ झाल्याने बाजारात अस्थिरता असल्याचे अधोरेखित झाले कारण मोठ्या प्रमाणात सोने चांदी व कच्च्या तेलाच्या निर्देशांकात वाढ झाली. लार्जकॅप शेअर्समध्ये झालेल्या घसरणीसह सकाळी मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्ये तुफान घसरण झाली. तसेच सेन्सेक्स व निफ्टीत थेट १% नुकसान झाल्यासह दोन्ही सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात तुफान घसरण झाल्याने बाजाराला हिरव्या रंगात परतण्यासाठी आधारभूत पातळीही मिळण्यास नामुष्की ओढवली.


अखेरच्या सत्रात शेअर बाजारात अधिक घसरण झाल्याने बाजारात सेल ऑफ झाल्याचे स्पष्ट झाले असताना दुसरीकडे अदानी कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास ११% घसरण झाल्याचा फटका गुंतवणूकदारांना झाला. कारण युएस नियामक असलेल्या युएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डाने अदानींची ईमेलद्वारे कथित लाच प्रकरणात चौकशी करण्याची परवानगी युएस न्यायालयात मागितली ज्याचा परिणाम बाजारात दिसला या व्यतिरिक्त ब्लू चिप्स कंपनीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, एसबीआय या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली असताना आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा, इन्फोसिस, टीसीएस शेअर्समध्ये किरकोळ वाढ कायम राहिली. डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक पातळीवरील नुकतेच ग्रीनलँड व युरोपियन युनियनशी चर्चा करणार असल्याचे घोषित केल्यानंतर बाजारात काही काळ स्थैर्यता आली असली तरी युएस कडून इराणच्या दिशेने जहाजे पाठवण्यात आल्याचे वृत्त स्पष्ट झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात नकारात्मक कौल दिला. आशियाई बाजार सकाळी जपानच्या मध्यवर्ती बँकेने आपल्या व्याजदरात कुठलाही बदल न करण्याचा निर्णय घेतल्याने मोठ्या प्रमाणात उसळला होता. त्यामुळे गिफ्ट निफ्टी, जकार्ता कंपोझिट वगळता इतर निर्देशांकात मोठी वाढ कायम राहिली असून युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात एस अँड पी ५००,नासडाक कंपोझिट निर्देशांकात वाढ झाली असून डाऊ जोन्स फ्युचरमध्ये मात्र किरकोळ घसरण झाली आहे.


आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ होम फर्स्ट फायनान्स (६.१२%), बंधन बँक (४.८२%), सोभा (२.८४%), हिंदुस्थान झिंक (२.८४%), ग्राविटा इंडिया (२.५६%), सन टीव्ही नेटवर्क (२.१६%), सीपीसीएल (१.७८%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण अदानी ग्रीन (१४.५४%), अदानी एंटरप्राईजेस (१०.६५%), वन ९७ (९.६५%), सिंजेन इंटरनॅशनल (८.२३%), अदानी पोर्टस (७.४८%), अनंत राज (६.७५%), फोर्स मोटर्स (६.६२%), इटर्नल (६.२३%), इंडिया सिमेंट (६.०३%) समभागात झाली आहे.


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,'शुक्रवारी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाले, कारण संपूर्ण सत्रात सततच्या विक्रीच्या दबावामुळे बाजारातील भावनांवर नकारात्मक परिणाम झाला. बेंचमार्क निफ्टी २५३४४ पातळीवर उघडला, थोड्याच वेळात २५३४७ पातळीच्या इंट्राडे उच्चांकाला स्पर्श केला आणि नंतर घसरून २५०५० पातळीच्या पातळीपर्यंत पोहोचला. क्षेत्रीय पातळीवर, विक्रीचा दबाव सर्वव्यापी होता, सर्व प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाले. रिअल्टी, पीएसयू बँका, मीडिया आणि ऊर्जा क्षेत्रातील शेअर्सना विक्रीचा सर्वाधिक फटका बसला, ज्यामुळे संपूर्ण बाजारात जोखीम टाळण्याची भावना दिसून आली. मॅक्रो पातळीवर, रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ९१.९५ रूपयांच्या नवीन विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास आणखी कमी झाला. याव्यतिरिक्त, सत्रादरम्यान काही विशिष्ट कंपन्यांच्या कमाईशी संबंधित प्रतिक्रियांमुळे घसरणीच्या दबावात भर पडली. डेरिव्हेटिव्ह्ज सेगमेंटमध्ये, बाजाराची स्थिती मोठ्या प्रमाणावर घसरणीच्या बाजूने झुकलेली होती. पेटीएम, सिप्ला, फिनिक्स लिमिटेड, बजाज फिनसर्व्ह आणि लोढा यांसारख्या शेअर्समध्ये ओपन इंटरेस्टमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली, जे सक्रिय पोझिशनिंग दर्शवते. निफ्टी ऑप्शन्समध्ये, २५३०० आणि २५५०० स्ट्राइक किमतींवर सर्वाधिक कॉल ओपन इंटरेस्ट दिसून आला, जे मजबूत प्रतिकार पातळी दर्शवते, तर २५००० स्ट्राइकवर सर्वाधिक पुट ओपन इंटरेस्ट होता, जो एक प्रमुख आधार म्हणून काम करत होता. पुट-कॉल रेशो (PCR) ०.५८ होता. एकूणच, चलनवाढीचा दबाव आणि डेरिव्हेटिव्ह बाजारातील सावध भूमिकेमुळे बाजारातील भावना नाजूक राहिल्याने बाजार कमकुवत स्थितीत बंद झाला.'

Comments
Add Comment

महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘बीग्सी’ अभिनव, खर्चमुक्त उपक्रम

मुंबई : महिला प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत गृह विभाग तसेच परिवहन विभागाच्या सहकार्याने

शहीदी समागम कार्यक्रमासाठी भव्य लंगरची व्यवस्था

नांदेड : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त २४ आणि २५ जानेवारी

महाराष्ट्राच्या ले. कर्नल सीता शेळके यांना ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार’ जाहीर

नवी दिल्ली : आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात शौर्य आणि तांत्रिक कौशल्याचा सुयोग्य वापर करणाऱ्या अहिल्यानगरच्या

शेअर बाजार गुंतवणूकदार आहात? मग एकाच ट्रेडिंग अँपवर सगळ काही भारतातील पहिला डिफाइनेज सिक्युरिटीजतर्फे अल्गो ट्रेडिंग प्लॅटफॉर्म ‘अल्गोस्ट्रा’ लाँच

मोहित सोमण: देशात सध्या मोठ्या प्रमाणात शेअर बाजार ट्रेडिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. प्रत्येकाचा विविध ग्राहक

मुंबईच्या नव्या महापौरांच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे राणीबागेतला महापौर बंगला

मुंबई : मुंबई महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. मुंबई महापालिकेत भाजपा

भारत सरकारकडून सिडबीमध्ये ५००० कोटी रुपयांचे भांडवली गुंतवणूक

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने, भारतातील विशाल सूक्ष्म, लघु आणि