बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण, आरोपीला २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

स्कूल व्हॅन मालकाला २४ हजारांचा दंड


बदलापूर : बदलापूर शहरात गुरूवारी रात्री चिमुरडीवरील लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली. बदलापूर पश्चिमेकडील एका नामांकित शाळेतील अवघ्या ४ वर्षीय चिमुरडीवर स्कूल व्हॅन चालकाने व्हॅनमध्येच लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणातील आरोपी चालकाला शुक्रवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता, पोक्सो विशेष न्यायालयाने त्याला २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पीडितेचे वकील ॲड. एम. पांडे यांनी दिली. कल्याण प्रादेशिक परिवहन कार्यालयाने संबंधित स्कूल व्हॅनवर कठोर कारवाई केली आहे. तपासात ही व्हॅन कोणतीही वैध परवानगी न घेता विद्यार्थ्यांची वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले. या गंभीर निष्काळजीपणाची दखल घेत आरटीओने व्हॅनचा परवाना रद्द करत मालकावर २४ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.


पीडित चिमुरडी शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे खासगी स्कूल व्हॅनमधून घरी जात होती. मात्र, त्या वेळी व्हॅनमध्ये महिला मदतनीस नसल्याचा फायदा घेत चालकाने चिमुरडीवर अत्याचार केल्याचे उघड झाले. मुलगी ठरलेल्या वेळेत घरी न पोहोचल्याने पालकांनी शोधाशोध सुरू केली. उशिरा घरी आल्यानंतर चिमुरडीने घडलेला प्रकार आईला सांगितला. धक्क्यातून सावरत पालक शाळेत गेले तेव्हा मुख्याधापिकेने दाद न दिल्यामुळे पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन चालकाला अटक केली.


प्राथमिक माहितीनुसार,संबंधित मुलगी नर्सरीत शिकत होती. मुलीचे पालक तिला घेऊन शाळेत गेले, त्यावेळी मुख्याधापिकेने ड्रायव्हरला शाळेत बोलावून घेतले. चालक शाळेत आल्यानंतर मुख्याधापिकांच्या केबिनमध्ये शिरला तेव्हा चिमुरडी घाबरली. ती आपल्या पालकांच्या पाठीमागे लपली.



शाळा प्रशासनावर कारवाईची मागणी


दीड वर्षांपूर्वी बदलापूर पूर्वेतील एका शाळेत अशीच अत्याचाराची घटना घडली होती. त्यानंतर सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप होत आहे. सदर शाळा अनधिकृत असल्याचा दावा बदलापूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष तथा शिक्षण सभापती प्रियंका दामले यांनी केला असून, शाळा प्रशासनावर कठोर कारवाईसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, “शाळा व स्कूल व्हॅनमधून विद्यार्थ्यांची वाहतूक करताना आवश्यक नियमांचे पालन होत नाही. या प्रकरणात आरोपीला न्यायालयाने २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे,” अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शौलेश काळे यांनी दिली आहे.

Comments
Add Comment

न्यूझीलंडविरुद्धच्या रायपूर टी २० मध्ये भारताचा विजय, मालिकेत २-० अशी आघाडी

रायपूर : भारताने न्यूझीलंडविरुद्धची रायपूरमधील टी २० मॅच सात विकेट राखून जिंकली. या विजयासह भारताने पाच मॅचच्या

'बाळासाहेबांसारखं राजकारण करणं यापुढे कोणालाच जमणार नाही'

राज ठाकरेंनी व्यक्त केल्या जयंतीदिनी आपल्या भावना मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सत्ता येते जाते. आजचे सत्ताधीश उद्या

दिंडोशी कोर्ट ते फिल्मसिटी उड्डाणपुलाचे काम ७५ टक्के पूर्ण

येत्या ३१ मे २०२६पर्यंत होणार वाहतुकीसाठी पूल खुले मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प

मुंबईत रस्त्यांच्या दुतर्फा विजेच्या खांबावर अनधिकृत बॅनर

मुंबई महापालिकेच्या परवाना विभागात ३ पोलिस ठाण्यात एफआयआर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका

विकास गोगावलेंसह एकूण आठ तर हनुमंत जगतापांसह एकूण पाच जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

महाड : महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील महाड नगरपरिषदेच्या मतदान केंद्र दोन शाळा क्रमांक पाचच्या बाहेरील

कठुआमध्ये जैशचा दहशतवादी ठार

कठुआ : जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत जैशचा एक दहशतवादी ठार झाला. जम्मूचे आयजीपी