माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रजासत्ताक दिनाच्या ‘भारत गाथा’ चित्ररथामध्ये संगीताची जादू साकारणार संजय लीला भन्साळी – श्रेया घोषाल

नवी दिल्ली : माहिती व प्रसारण मंत्रालयने भारतीय सिनेमा आणि कथाकथनाच्या परंपरेचा गौरव करत प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथासाठी दोन दिग्गज सर्जनशील व्यक्तिमत्त्वांना एकत्र आणले आहे—प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल.


माहिती व प्रसारण मंत्रालयच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधील चित्ररथासाठी संजय लीला भन्साळी यांनी ‘भारत गाथा’ ही संकल्पना साकारली आहे. हा एक ऐतिहासिक क्षण मानला जात आहे, कारण पहिल्यांदाच एखादा भारतीय चित्रपट दिग्दर्शक देशाच्या सर्वात मोठ्या औपचारिक समारंभात भारतीय सिनेमाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या विशेष दृष्टीकोनाला अधिक प्रभावी रूप देण्यासाठी भन्साळी यांनी श्रेया घोषाल यांची निवड एका खास गीतासाठी केली आहे. हे गीत २६ जानेवारी रोजी कर्तव्य पथावर सादर होणाऱ्या टॅब्लोसह ऐकायला मिळणार आहे.


‘भारत गाथा’शी संबंधित माहिती व प्रसारण मंत्रालयाचा हा चित्ररथ भारताच्या कथाकथनाच्या समृद्ध परंपरेचे दर्शन घडवतो—जिथे संगीत, दृश्य, अभिनय आणि सिनेमा एकत्र येऊन आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनतात. आजच्या काळात भारतीय सिनेमा देशाच्या कथा जगासमोर मांडण्याचे एक सशक्त माध्यम ठरले आहे. त्यामुळेच या भव्य सांस्कृतिक प्रवासात सिनेमाला विशेष स्थान देण्यात आले आहे.


या प्रकल्पाशी संबंधित एका जवळच्या सूत्रांच्या माहितीनुसार, “संजय लीला भन्साळी यांनी संकल्पित केलेल्या ‘भारत गाथा’ या प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथासाठी श्रेया घोषाल यांनी एक विशेष गीत गायले आहे. भन्साळी यांच्या कथाकथनात संगीताला नेहमीच महत्त्वाचे स्थान असते आणि श्रेया यांच्यासोबतचे त्यांचे सहकार्य नेहमीच वेगळी भावनिक खोली निर्माण करते. याआधीही या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर करणारे अनेक क्षण दिले आहेत आणि यावेळी तोच संगीतमय जादू कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये अनुभवायला मिळणार आहे.”


हा सहकार्य माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या त्या दृष्टीकोनाचे प्रतिबिंब आहे, ज्यामध्ये भारतीय सिनेमाकडे केवळ मनोरंजन म्हणून नाही, तर भारताच्या सभ्यतागत कथाकथनाच्या परंपरेचा विस्तार म्हणून पाहिले जाते—एक अशी सांस्कृतिक ताकद जी आजही जागतिक पातळीवर देशाची ओळख ठरते. भन्साळी यांची सिनेमाई दृष्टी ‘भारत गाथा’ला आकार देत आहे, तर श्रेया घोषाल यांचा स्वर त्यात प्राण फुंकत आहे. या प्रकारे, माहिती व प्रसारण मंत्रालयाचा ‘भारत गाथा’ टॅब्लो भारतीय कथाकथनाच्या परंपरेला भावनिक श्रद्धांजली अर्पण करणारा ठरणार आहे—जिथे इतिहास, संस्कृती आणि सिनेमा एकत्र येतात.

Comments
Add Comment

कठुआमध्ये जैशचा दहशतवादी ठार

कठुआ : जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत जैशचा एक दहशतवादी ठार झाला. जम्मूचे आयजीपी

विकसित भारताच्या उभारणीसाठी संपूर्ण देश एकजूट: पंतप्रधान

तिरुवनंतपुरम : विकसित भारत घडवण्यासाठी आज संपूर्ण देश एकजुटीने प्रयत्न करत आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र

पश्चिम बंगालमध्ये एसआयआर सुनावणी शिबिरावर हल्ला

जिवाच्या भीतीने सुनावणी सोडून पळाले अधिकारी दिनाजपूर : पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील

महाराष्ट्राच्या ले. कर्नल सीता शेळके यांना ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार’ जाहीर

नवी दिल्ली : आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात शौर्य आणि तांत्रिक कौशल्याचा सुयोग्य वापर करणाऱ्या अहिल्यानगरच्या

Republic Day 2026 : 'वंदे मातरम्'ची दीडशे वर्षे अन् ७७ वा प्रजासत्ताक दिन; दिल्लीचा 'कर्तव्य पथ' सज्ज, यंदा काय खास ?

नवी दिल्ली : येत्या २६ जानेवारी रोजी संपूर्ण देश आपला ७७ वा प्रजासत्ताक दिन अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यासाठी

Vaishno Devi Yatra : वैष्णोदेवी यात्रेला निसर्गाचा 'ब्रेक'! मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे यात्रा स्थगित; ३६ तासांचा हाय अलर्ट

कटरा : उत्तर हिंदुस्थानात सध्या कडाक्याची थंडी आणि जोरदार बर्फवृष्टी सुरू असून, याचा मोठा फटका माता