Friday, January 23, 2026

बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी निमित्त आठवणींना उजाळा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिवादन

बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी निमित्त आठवणींना उजाळा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिवादन

मुंबई : महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय प्रवाहाला ठोस आकार देणारे नेते म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त राज्यभरातून अनेक नेते मंडळी त्याशिवाय सामान्य जनतेकडूनही अभिवादन करण्यात येत आहे. ठाम भूमिका, परखड विचारसरणी आणि जनतेशी थेट संवाद साधण्याची ताकद यामुळे बाळासाहेबांनी जनमानसावर कायमची छाप उमटवली.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांना अभिवादन केले आहे. बाळासाहेबांच्या सोबतच्या आठवणीचे काही खास क्षण त्यांनी आपल्या एक्स वर पोस्ट केले आहेत. नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट यामध्ये लिहिलंय की "बाळासाहेब ठाकरे यांची ओळख केवळ राजकीय नेते म्हणून नव्हे, तर समाजाचं बारकाईने निरीक्षण करणारे विचारवंत होते. त्यांच्या भाषणांमधून सामाजिक प्रश्न, राजकीय घडामोडी आणि महाराष्ट्राच्या हिताचा मुद्दा ठळकपणे मांडला जायचा, त्यांचा शब्दातही धार होती.

https://x.com/narendramodi/status/2014515348041806174?s=20

राजकारणाबरोबरच कला, साहित्य आणि पत्रकारितेचा त्यांना विशेष अभ्यास होता. व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी समाजातील विसंगती, सत्ताकारण आणि लोकजीवनावर नेमकं भाष्य केलं. त्यांच्या कार्टूनमधून निर्भीड मतप्रदर्शन आणि विचारांची स्पष्टता दिसून येत असे, ज्यामुळे ते सामान्य माणसापर्यंत सहज पोहोचले."

महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी बाळासाहेब ठाकरे यांनी मांडलेली दृष्टी आजही अनेकांना मार्गदर्शक ठरत आहे. मराठी अस्मिता, स्वाभिमान आणि राज्याच्या विकासाचा ध्यास त्यांच्या कार्यातून सातत्याने दिसून आला. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करण्याचा संकल्प आम्ही करत आहोत.'

बाळासाहेब म्हणजे अस्विस्मर्णीय नेतृत्व ज्याचं स्थान मराठी माणसाच्या मनात हे कायम असेलच.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >