महाड : तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ५ जागांसाठी एकूण २५ तर पंचायत समितीच्या १० जागांसाठी एकुण ४३ उमेदवारी अर्ज आज शेवटच्या दिवसा अखेर दाखल झाले आहेत. २७ जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखे नंतर तालुक्यात लढत दुरंगी की तिरंगी होणार हे स्पष्ट होणार आहे. तालुक्यातील बिरवाडी जि.प. गटात शिवसेनेकडून मंदा भागोजी ढेबे, राष्ट्रवादी काँग्रेस कडून पल्लवी प्रदीप बागडे, शिवसेना ठाकरे गटाकडून दिपाली सुभाष मोरे, राष्ट्रवादी कडून रिया रविंद्र घोलप ( डमी) असे ४ अर्ज दाखल असून या गटात तिरंगी लढत होणार आहे. धामणे पं. स. गणात शिवसेनेकडून अनिल नारायण जाधव, ओंकार अनिल जाधव (डमी), राष्ट्रवादी कडून गणेश लक्ष्मण खामकर असे ३ अर्ज दाखल असून या गणात दुरंगी लढत होणार आहे.पण बिरवाडी पं स गणात शिवसेनेकडून लक्ष्मण नारायण वाडकर, राष्ट्रवादी कडून मयुर पुंडलिक जाधव, राजेश चंद्रकांत जाधव(डमी), असे ३ अर्ज दाखल असून या गणात दुरंगी लढत होणार आहे.
खरवली जि प गटात शिवसेनेकडून मनाली मनोज काळीजकर, राष्ट्रवादीकडून निकीता दत्ता सुतार, रिया रविंद्र घोलप (डमी), शिवसेना ठाकरे गटाकडून पुर्वा आनंद सुर्वे असे ४ अर्ज दाखल असून या गटात तिरंगी लढत होणार आहे.
वरंध पं स गणात भाजपकडून ७ अर्ज दाखल असून या गणात तिरंगी लढत होणार आहे. खरवलीत शिवसेनेकडून४ अर्ज दाखल असून या गणात दुरंगी लढत होणार आहे. नडगांव तर्फे शिवसेनेकडून ६ अर्ज दाखल असून या गणात चौरंगी लढत होणार आहे. नडगावतर्फे ४ अर्ज दाखल असून या गणात दुरंगी लढत होणार. नाते गणात ५अर्ज दाखल असून या गणात चौरंगी लढत होणार आहे. दासगांवमध्ये ३ अर्ज दाखल.दासगांव ३ अर्ज दाखल असून या गणात दुरंगी लढत होणार आहे. तुडीलमध्ये शिवसेनेकडून ४ अर्ज दाखल असून या गणात तिरंगी लढत होणार. करंजाडी राष्ट्रवादीकडून ८ अर्ज दाखल असून या गणात चौरंगी लढत होणार आहे. करंजाडीत शिवसेनेकडून ५ अर्ज दाखल होणार आहे. विन्हेरेत शिवसेनेकडून ५ अर्ज दाखल असून या गणात तिरंगी लढत होणार आहे.