खाजगी क्षेत्राची डिसेंबर तुलनेत जानेवारीत 'या' कारणामुळे जोरदार वापसी! ११ महिन्यांच्या तुलनेत फिनिक्स झेप - HSBC PMI Index अहवाल

मोहित सोमण: विविध जागतिक व घरगुती आर्थिक अस्थिरतेतील कारणांमुळे काही अंशी खाजगी कंपन्यांच्या वाढीत घट झाली होती. त्यामुळे कंपन्यांच्या उत्पादन व सेवेत मंदी आली असताना पुन्हा एकदा तेजीचा अंडरकरंट कायम राखण्यात खाजगी क्षेत्राला यश मिळाले आहे. एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय इंडेक्स २०२५ या अहवालाने खाजगी क्षेत्रात जानेवारी महिन्यातील दमदार वाढ झाल्याचे स्पष्ट केले आहे. नव्या अहवालाच्या आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये ५७.८ वरून जानेवारी महिन्यात ही आकडेवारी ५९.५ पातळीवर पोहोचली. प्रामुख्याने ही वाढ उद्योगात झालेल्या वाढीमुळे, रोजगार निर्मितीमुळे व नव्या ऑर्डर्समुळे झाली असल्याचे म्हटले गेले आहे. तसेच या व्यवसायाच्या आशावादी दृष्टिकोनात आणखी भर पडल्याने हा करिष्मा प्राप्त करण्यासाठी खाजगी क्षेत्राला यश आल्याचेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले. डिसेंबर महिन्यात ही आकडेवारी ११ महिन्यातील सर्वाधिक ५७.८ या निचांकी पातळीवर घसरली होती जी रिबाऊंड होत जानेवारीत ५९.५ पातळीवर पोहोचली. उत्पादनातील आऊटपूटमध्येही वाढ होत असताना क्षेत्रीय वाढीतही समान पातळीवर भर पडली. त्यामुळे एकत्रित फायदा या खाजगी क्षेत्रात झाल्याचे अहवालाने म्हटले.


याविषयी बोलताना खाजगी क्षेत्राच्या कामकाजातील वाढीच्या गतीला आधार देणारी गोष्ट म्हणजे एकूण नवीन व्यवसायाच्या स्वीकृतीत झालेली जलद वाढ असे अहवालात म्हटले गेले आहे. यावर आपले आणखी निरिक्षण नोंदवताना सर्वेक्षण सदस्यांनुसार,'वाढत्या मागणीची परिस्थिती आणि आक्रमक विपणन (Aggressive Marketing) मो हिमांमुळे विक्रीला चालना मिळाली.सेवा क्षेत्रातील तुलनेत उत्पादकांनी अधिक जलद सुधारणा नोंदवली, तथापि दोन्ही बाबतीत वाढीने वेग घेतला असे आपल्या नोंदीत म्हटले. अहवालातील माहितीनुसार,जानेवारीच्या आकडेवारीनुसार, एकूण आंतरराष्ट्रीय ऑर्डर्समध्ये लक्षणीय वाढ दिसून आली, जी चार महिन्यांतील सर्वात मोठी वाढ होती. आशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप, लॅटिन अमेरिका आणि मध्य पूर्व ही नोंदणीची प्रमुख गंतव्य स्थान राहिली असेही यावेळी अहवालाने नमूद केले.


उपलब्ध माहितीनुसार, डिसेंबरमधील रोजगारात कोणताही बदल न झाल्यानंतर, जानेवारीमध्ये भारतातील खाजगी क्षेत्रात नोकरभरती पुन्हा सुरू झाली. जरी ही वाढ किरकोळ असली तरी, नोकरी निर्मितीचा वेग मोठ्या प्रमाणात मालिकेच्या ट्रेंडशी सुसंगत होता असे अहवालात म्हटले गेले आहे. जानेवारीच्या आकडेवारीनुसार, खाजगी क्षेत्रातील प्रलंबित कामांच्या प्रमाणात सलग वाढ दिसून आली परंतु एकूण संचय केलेल्या कार्याचा दर किरकोळ होता व तो केवळ वस्तू उत्पादकांमधील वाढीमुळे तो प्रेरित होता. सेवा क्षेत्रात सध्याचे काम वेळेवर पूर्ण करण्यास सक्षम होते असेही अहवालात म्हटले गेले आहे. तसेच यंदा जानेवारीमध्ये एकत्रित स्तरावरील इनपुट किमती चार महिन्यांतील सर्वात वेगवान गतीने वाढल्या आहेत जरी ऐतिहासिक मानकांनुसार ही वाढ माफक होती. आकडेवारीनुसार, सेवा अर्थव्यवस्थेत खर्चाचा दबाव अधिक स्पष्ट होता.त्याच वेळी, उत्पादन आणि सेवा श्रेणींमध्ये आउटपुट किंमत वाढीचे दर जुळले. एकत्रितपणे, त्यांनी तीन महिन्यांत खाजगी क्षेत्रातील शुल्कामध्ये सर्वात वेगवान वाढ दर्शविली. असे असले तरी, संबंधित हंगामानुसार समायोजित निर्देशांक (Adjusted Index) त्याच्या दीर्घकालीन सरासरीइतका होता.


सर्वेक्षणात वाढता इनपुट, श्रम आणि वाहतूक खर्च नफ्याचे प्रमाण टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नांमध्ये ग्राहकांवर हस्तांतरित केला जात होता. त्यांनी विशेषतः अन्न, अंडी, मांस आणि भाज्या, इंधन आणि स्टीलवरील खर्चात वाढ झाल्याचे नोंदवले गेले होते. व्यवसायातील १२ महिन्यांच्या दृष्टिकोनाचे मूल्यांकन करताना,भारतीय खाजगी क्षेत्रातील कंपन्या आशावादी होत्या. सकारात्मक भावनांची एकूण पातळी दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहिली, परंतु ती तीन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली. पॅनेल सदस्यांच्या मते, कार्यक्षमतेतील वाढ आणि मागणीतील तेजी यामुळे वाढीच्या शक्यतांसाठी चांगले संकेत मिळत होते. वाटप केलेले मार्केटिंग बजेट आणि अनुकूल विनिमय दर हे देखील सकारात्मक घटक म्हणून ओळखले गेले असे अहवालात म्हटले गेले आहे.


या अहवालातील निरिक्षणावर भाष्य करताना एचएसबीसीच्या मुख्य भारत अर्थशास्त्रज्ञ प्रांजुल भंडारी म्हणाल्या आहेत की,'एचएसबीसी फ्लॅश पीएमआयने दर्शविल्याप्रमाणे, उत्पादन आणि सेवा या दोन्ही क्षेत्रांची वाढीची गती वाढली आहे. उत्पादन पीएमआयमध्ये वाढ होऊनही, जानेवारीचा आकडा २०२५ च्या सरासरीपेक्षा कमी राहिला. २०२५ च्या अखेरीस काहीशी गती मंदावल्यानंतर, नवीन ऑर्डर्समध्ये अधिक वेगाने वाढ झाली ज्याचे मुख्य कारण देशांतर्गत ऑर्डर्समध्ये झालेली जलद वाढ हे होते. कच्च्या मालाच्या खर्चाचा दबाव वेगाने वाढला, तथापि तो सेवा पुरवणाऱ्यांपेक्षा वस्तू उत्पादकांवर अधिक होता.'

Comments
Add Comment

'बाळासाहेबांसारखं राजकारण करणं यापुढे कोणालाच जमणार नाही'

राज ठाकरेंनी व्यक्त केल्या जयंतीदिनी आपल्या भावना मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सत्ता येते जाते. आजचे सत्ताधीश उद्या

दिंडोशी कोर्ट ते फिल्मसिटी उड्डाणपुलाचे काम ७५ टक्के पूर्ण

येत्या ३१ मे २०२६पर्यंत होणार वाहतुकीसाठी पूल खुले मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प

मुंबईत रस्त्यांच्या दुतर्फा विजेच्या खांबावर अनधिकृत बॅनर

मुंबई महापालिकेच्या परवाना विभागात ३ पोलिस ठाण्यात एफआयआर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका

विकास गोगावलेंसह एकूण आठ तर हनुमंत जगतापांसह एकूण पाच जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

महाड : महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील महाड नगरपरिषदेच्या मतदान केंद्र दोन शाळा क्रमांक पाचच्या बाहेरील

कठुआमध्ये जैशचा दहशतवादी ठार

कठुआ : जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत जैशचा एक दहशतवादी ठार झाला. जम्मूचे आयजीपी

विकसित भारताच्या उभारणीसाठी संपूर्ण देश एकजूट: पंतप्रधान

तिरुवनंतपुरम : विकसित भारत घडवण्यासाठी आज संपूर्ण देश एकजुटीने प्रयत्न करत आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र