परळच्या केईएम रुग्णालयाचे नाव बदला

मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

मुंबई : सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक (के. ई. एम.) रुग्णालयाचे नाव बदलण्यात यावे असे सूचना वजा निर्देश कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवीन धोरणानुसार या रुग्णालयाचे नामांतर करण्यात यावे असे त्यांनी म्हटले. दरम्यान मुंबई महापालिकेचा अधिनियमात ब्रिटिश कालीन इंग्रजी नावे बदलण्याची स्पष्ट तरतूद असून त्याद्वारे वास्तू, रस्ते यांची नावे बदलून नव्याने ठेवली जात आहेत.


सेठ गोर्धनदास सुंदरदास महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रुग्णालयाच्या शतक महोत्सवी समारंभात गुरुवारी लोढा उपस्थितांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी आमदार कालिदास कोळंबकर, उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. शैलेश मोहिते, अधिष्ठाता (केईएम रुग्णालय) डॉ. संगीता रावत आदी मान्यवर उपस्थित होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रातील देशभरातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभावे, या अनुषंगाने संवाद केंद्र (कम्युनिकेशन सेंटर) उभारण्यात यावे. या केंद्रामुळे विद्यार्थ्यांना देशभरातील तज्ज्ञ व्यक्तींशी जोडले जाणे शक्य होईल. वैद्यकीय क्षेत्रात मोठी स्वप्न पाहणाऱया विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र मार्गदर्शक ठरावे, असेही लोढा यावेळी म्हणाले. येणाऱ्या नागरिकांच्या सुविधेसाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देतानाच कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञानस्नेही सुविधा उपलब्ध करून देण्यासह केंद्र, राज्य सरकारच्या आरोग्य योजनांची माहिती नागरिकांना देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश लोढा यांनी दिले.


आरोग्य सेवा गुणवत्तापूर्ण आणि कार्यक्षमपणे उपलब्ध करून देतानाच डिजिटल तंत्रज्ञाचाही वापर केईएम रुग्णालयात प्रभावीपणे करण्यात आला आहे. ‘रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणाली’ (हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम)या सुविधेचा अतिशय प्रभावीपणे वापर करण्यासाठी केईएम रुग्णालय सज्ज झाले आहे. लवकरच संपूर्ण क्षमतेने या प्रणालीचा वापर रुग्णालयात सुरु होईल, अशी माहिती उपायुक्त शरद उघडे यांनी कार्यक्रमादरम्यान दिली. रुग्णालयातील रुग्णशय्या क्षमता ही २ हजार असून येथे प्रतिदिन ६ हजार बाह्यरुग्ण हाताळण्याची क्षमता आहे. के. ई. एम. रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका, चतुर्थ श्रेणी कर्मचारी या सगळ्यांचे योगदान यामध्ये आहे. रुग्णांच्या सुविधेसाठी येत्या काळात ‘सर्व्हीस टॉवर’ निर्माण करण्यात येत आहे. या टॉवरच्या माध्यमातून रुग्णांना विविध चाचण्यांची सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्याचा रुग्णालय प्रशासनाचा मानस असल्याची माहिती के.ई.एम. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी दिली. वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांसाठी १२०० विद्यार्थी क्षमता असलेल्या वसतिगृहाची सुविधा लवकरच उपलब्ध होत आहे, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली

Comments
Add Comment

Mahalakshmi Bridge : रेल्वे रुळांवरून धावणार पालिकेचा पहिला 'केबल-स्टेड' पूल; ५५% काम फत्ते; सात रस्ता, महालक्ष्मी...अजून कुठे कुठे? पाहा नेमका मार्ग

मुंबई : दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक सुलभ करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे

महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत हवामानाचा बदल; ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज, बळीराजा चिंतेत

मुंबई : देशाच्या विविध भागांमध्ये सध्या हवामानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण

मध्य रेल्वेद्वारा मुंबई–नागपूर / मडगाव दरम्यान ४ विशेष रेल्वे सेवा

मुंबई  : रेल्वे प्रवासाच्या वाढत्या मागणीचा विचार करता, मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई –

पश्चिम रेल्वेचे दोन गाड्यांच्या टर्मिनल आणि डब्यांच्या रचनेत तात्पुरते बदल

मुंबई कर्णावती एक्सप्रेस वांद्रे टर्मिनस येथून आणि वंदे भारत एक्सप्रेस २० डब्यांच्या रेकसह धावणार मुंबई  : २२

‘संस्कृती, मराठी भाषा आणि तंत्रज्ञानाचा समन्वय काळाची गरज’

मुंबई  : सार्वजनिक उत्सव, व्याख्यानमाला आणि सांस्कृतिक उपक्रम हे समाज, संस्कृती, राष्ट्र आणि एकता यांना एकत्र

महालक्ष्‍मी येथील उड्डाणपुलाचे काम ५५ टक्के पूर्ण

अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांच्‍याकडून स्‍थळ पाहणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महालक्ष्‍मी