Pune Crime :डेटिंगच्या नादात तरुन फसला,पुण्यात युवकाला नको त्या जागी बोलावुन त्याला...!

पुणे : डेटिंग अॅपवर आरोपीची आणि पिडीत तरुणाची ओळख झाली अन् मध्यरात्री पेट्रोल पंपाजवळ भेटायचं अमिष दाखवून त्याला बोलावून घेतलं. यानंतर त्याच्याकडुन ८० हजारांची रोकड घेऊन व दागिने लुटुन चोरटे पळाले. या प्रकरणी आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करत चौघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना पुण्यातील कोंढवा येथे घडली आहे.

राहिल अकिल शेख (वय १९, रा. सोमजी, कोंढवा), शाहीद शानूर मोमीन (वय २५, रा. कात्रज), रोहन नईम शेख (वय १९, रा. कोंढवा बु.), इशान निसार शेख (वय २५, रा. कात्रज) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २७ वर्षीय तरुण वाघोली परिसरात राहतो. ११ जानेवारी रोजी तो मोबाइलवर डेटिंग ॲप वापरत असताना एका अनोळखी व्यक्तीने त्याच्याशी संपर्क साधला. ओळख वाढल्यानंतर आरोपीने ‘कुठे राहतोस?’ अशी चौकशी करत रात्री नऊच्या सुमारास कोंढव्यातील शीतल पेट्रोल पंपाजवळ भेटण्यास बोलावले.

तक्रारदार तेथे पोहोचताच आधीच दबा धरून बसलेल्या तिघांनी त्याला धारदार हत्याराचा धाक दाखवला. त्यानंतर त्याला कोंढव्यातील पानसरेनगर परिसरातील मोकळ्या जागेत नेऊन शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. आरोपींनी त्याच्याकडील मोबाइल व सोन्याची अंगठी हिसकावून घेतली तसेच एटीएममधून पैसे काढण्यास भाग पाडले. एकूण सुमारे ८० हजार रुपयांचा ऐवज लुटून घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देत आरोपी पसार झाले.

तक्रारीनंतर कोंढवा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत चौघांना अटक केली. दरम्यान, डेटिंग ॲपच्या माध्यमातून होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 
Comments
Add Comment

मुंबई महापालिकेत भाजप शिवसेनेचा एकच गट?

स्वीकृत नगरसेवकांसह समित्यांमधील बदलणार समिकरणे मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये

प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत -शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई - भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येत्या 26 जानेवारी रोजी राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व

T20 World Cup मध्ये नव्या संघाची एन्ट्री होणार, बांगलादेशच्या बहिष्कारानंतर ICC लवकरच घोषणा करणार

ढाका : बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आगामी T20 वर्ल्ड कप २०२६ वर बहिष्कार घालत असल्याची

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष निनादणार

गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक' चित्ररथ सज्ज नवी दिल्ली: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या

दावोसमध्ये महाराष्ट्राने केले तब्बल ३० लाख कोटींचे गुंतवणूक करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; १८ देशांमधून राज्यात मोठी गुंतवणूक येणार मुंबई : स्वित्झर्लंडमधील

आताची सर्वात मोठी बातमी: सरकारची कर्मचाऱ्यांचे पगार दणदणीत वाढणार वेतन आयोगाकडे 'या' मोठ्या शिफारशी

प्रतिनिधी: आठवे वेतन आयोगाबात आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट