भरत गीते यांच्यासारख्या मराठी उद्योजकांचा अभिमान : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सामंजस्य करारानंतर वर्षभरात उद्योग उभारणीचे दावोस येथे कौतुक


दावोस : “जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) गेल्या वर्षी करण्यात आलेल्या ५०० कोटी रुपयांच्या सामंजस्य कराराची ‘अॅल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे उद्योजक भरत गीते यांनी अवघ्या एका वर्षात यशस्वी अंमलबजावणी करून प्रत्यक्ष उत्पादन सुरू केले आहे. वर्षभरात उद्योग उभारणी करणाऱ्या गीते यांच्यासारख्या मराठी उद्योजकांचा मला अभिमान वाटतो," असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.


दावोस येथे सुरु असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत देवेंद्र फडणवीस आणि भरत गीते यांच्यातील संवादावेळी ते बोलत होते. या भेटीदरम्यान उद्योग उभारणीतील नियोजन, वेगवान अंमलबजावणी, प्रशासन आणि उद्योजकांमधील समन्वय तसेच उत्पादन क्षेत्राचे अर्थव्यवस्थेतील वाढते महत्त्व यावर सविस्तर चर्चा झाली. ‘आत्मनिर्भर भारत’, ‘मेक इन इंडिया’ आणि ‘व्होकल फॉर लोकल’ या केंद्र सरकारच्या उपक्रमांना बळ देणाऱ्या या उपक्रमांतून कमी कालावधीत उद्योग उभारणी शक्य असल्याचा प्रेरणादायी संदेश देशभरातील उद्योजकांना मिळाला आहे.


देवेंद्र फडणवीस म्हणाले, "अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा एमआयडीसी येथे उभारण्यात आलेल्या ‘तौरल इंडिया’च्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम कास्टिंग्ज उत्पादन प्रकल्पाने अल्पावधीतच उत्पादन सुरू करत राज्यासमोर आदर्श औद्योगिक मॉडेल उभे केले आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून, स्थानिक औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळाली आहे."


“सामंजस्य करार कागदापुरता न राहता एका वर्षात प्रत्यक्ष उत्पादनात रूपांतरित होऊ शकतो, याचे भरत गीते आणि तौरल इंडिया हे उत्तम उदाहरण आहे. मराठी उद्योजकांमध्ये जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची क्षमता आहे. त्यांना योग्य धोरणात्मक पाठबळ दिल्यास महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात नवे शिखर गाठेल," असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.


"उत्पादन क्षेत्र हे मजबूत अर्थव्यवस्थेचा कणा असून, वाहन उद्योग, अभियांत्रिकी, पायाभूत सुविधा, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक मोबिलिटी, संरक्षणपूरक उद्योग, कृषी प्रक्रिया आणि उच्च-मूल्य निर्यातक्षम उत्पादन क्षेत्र मजबूत झाल्यास राज्याचा औद्योगिक पाया अधिक भक्कम होईल," असा विश्वास गीते यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सअ‍ॅप नियंत्रक मेटा कंपनीला कोर्टाचा दणका, भरावा लागणार अब्जावधींचा दंड

न्यू मेक्सिको : अमेरिकेतील न्यू मेक्सिकोमधील कोर्टाच्या ज्युरीने 'मेटा' या सोशल मीडिया कंपनीला मुलांच्या मानसिक

Iran-US-Israel War : धक्कादायक! इस्रायलचा तेहरानमधील रुग्णालयावर हल्ला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ले पाच दिवस थांबवण्याची घोषणा केली असतानाही

Iran-US-Israel War : अमेरिकेकडून युध्दविरामाची घोषणा तरीही इस्रायलकडून मात्र युद्ध सुरूच राहणार - पंतप्रधान नेतन्याहू

- इराण आणि लेबनॉनवरील हल्ले सुरूच राहतील - पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड

Iran-US-Israel War : इराणकडून हल्ल्यासाठी पश्चिम आशियातील वीज, जल प्रकल्पांची यादी जाहीर

अमेरिकेकडून इराणच्या ऊर्जा केंद्रांवर हल्ला करण्याची धमकी देण्यात आल्यानंतर, त्याला प्रत्युत्तर म्हणून

रशिया इराणला गुप्तचर मदत पुरवत आहे, आमच्याकडे याचे पुरावे - राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की

पश्चिम आशियामध्ये सतत वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की

टेक्सासमधील व्हॅलेरो रिफायनरीत भीषण स्फोट; आकाशात काळ्या धुराचे लोट, नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश

व्हॅलेरो एनर्जीद्वारे चालवली जाणारी टेक्सासमधील पोर्ट आर्थर येथील रिफायनरीमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना