प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत -शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई - भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येत्या 26 जानेवारी रोजी राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये एकाचवेळी ‘देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेवर आधारित असणाऱ्या या कवायती शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमानंतर होणार असून यामध्ये राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांमधून, सात लाखापेक्षा जास्त शिक्षकांच्या उपस्थितीत सुमारे दोन कोटींपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, स्वयंशिस्त, आरोग्य जागृती, शारीरिकदृष्ट्या कसरत/ व्यायाम करण्यासाठी प्रेरित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.


याबाबत मंत्री श्री.भुसे यांनी मंत्रालयात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यावेळी उपस्थित होते.


मंत्री श्री.भुसे म्हणाले, या कवायतींचा कालावधी साधारतः 15 ते 20 मिनिटांचा असेल. यासाठी सर्व शाळांना नमुना मार्गदर्शक व्हिडीओ पुरविण्यात आलेला असून सध्या प्रत्येक शनिवारी विद्यार्थ्यांचा सामूहिक स्वरुपात कवायत संचलन सराव करून घेण्यात येत आहे. प्रजासत्ताक दिनी सामूहिक कवायत संचलन असल्यामुळे गावातील, शहरातील मैदानाच्या क्षमतेनुसार विद्यार्थी शाळेत अथवा एका मैदानावर एकत्र करून कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमास परिसरातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी, पालक व समाजसेवी गणमान्य प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रत्येक 10 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक मार्गदर्शनासाठी नेमण्यात आलेला आहे.


मंत्री श्री.भुसे म्हणाले, हा कार्यक्रम देशभक्तीमय वातावरणात होणार असून शालेय शिक्षण आयुक्त हे या कार्यक्रमाचे सर्व व्यवस्थापन पाहत आहे. आजारी, अशक्त, दिव्यांग अशा विद्यार्थ्यांना कवायत करण्याची सक्ती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी आदींनी या कार्यक्रमासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Comments
Add Comment

Mumbai Update : मुंबईत मलेरियाचा वाढता धोका; 3,177 रुग्णांची नोंद, डेंग्यू-लेप्टोमध्ये मात्र घट

Mumbai : मुंबईत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने उपाययोजना तीव्र

Mumbai Navy Nagar News : नौदल जवान, पत्नी अन् दोन चिमुकल्यांचा संशयास्पद मृत्यू; मुंबईतील 'नेव्ही नगर'मध्ये धक्कादायक घटना

राजस्थान : राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील ककराना गावातील रहिवासी आणि भारतीय नौदलात कार्यरत असलेले जवान

Maha Walkathon 2026 : महा वॉकेथॉन 2026 मध्ये अभिनेता संजय दत्त यांचा सहभाग; 36 जिल्ह्यांत ‘वॉक फॉर वॉटर’

मुंबई : माती आणि जलसंधारणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण

Devendra Fadnavis : दोन वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सिंगापूर आणि 'यूएई'ला मागे टाकेल

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास; अमेरिकेतील कंपन्यांकडून गुंतवणुकीचा ओघ वाढणार मुंबई : "राज्याचा

Sameer Wankhede on FDA Raids : तुकाराम मुंढे फार काही वेगळं करतायत असं नाहीये...तुकाराम मुंढेंबाबतच्या प्रश्नावर समीर वानखेडेंचे थेट उत्तर!

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे (NCB) माजी विभागीय संचालक आणि चर्चित आयआरएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आपल्या रोखठोक

Accident News : मिरा रोडमध्ये भरधाव वाहनाने नागरिकांना उडवलं; धडकेनंतर चालक फरार, व्हिडिओ व्हायरल

मिरा रोड:  मिरा-भाईंदर येथे भरधाव आणि बेदरकार वाहनचालकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिरा रोड येथील जे.पी.