अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर

वॉशिंग्टन डीसी : अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडली आहे. जानेवारी २०२५ मध्येच ट्रम्प प्रशासनाने जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. नियमांनुसार, एक वर्षाच्या नोटीसनंतर २२ जानेवारी २०२६ पासून अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेची सदस्य राहणार नाही.


अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करत तब्बल ६६ आंतरराष्ट्रीय संघटनांतून बाहेर पडत असल्याची अधिकृत घोषणा आठ जानेवारी २०२६ रोजी केली आहे. अमेरिका संयुक्त राष्ट्रांशी संबंधित असलेल्या ३१ आणि संयुक्त राष्ट्रांशी संबंधित नसलेल्या ३५ आंतरराष्ट्रीय संघटनांतून बाहेर पडणार आहे. अमेरिका ज्या संस्थांमधून बाहेर पडणार आहे त्यात इंटरनॅशनल सोलर अलायन्स‌, संयुक्त राष्ट्र हवामान बदल फ्रेमवर्क कन्व्हेन्शन‌, संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी या मोठ्या संस्था आहेत.


ट्रम्प समर्थक २०२५ आणि २०२६ मध्ये घेतलेल्या या मोठ्या निर्णयांना अमेरिकेच्या सार्वभौमत्वाचे रक्षण आणि करदात्यांच्या पैशांची बचत अशा विचारांतून बघत आहेत. तर अनेक आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे.

Comments
Add Comment

Pakistan : इराण-अमेरिका युद्धाचा पाकिस्तानला दणका; इंधनाचे दर भडकल्याने जनता रस्त्यावर, देशात 'एनर्जी लॉकडाऊन'!

इस्लामाबाद : इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे शेजारील देश असलेल्या पाकिस्तानची झोप

Donald Trump : आज रात्री एक संपूर्ण संस्कृती नष्ट होईल...;डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा

वॉशिंग्टन : इराण आणि इस्रायलमधील संघर्ष आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड

America: अमेरिका एफ-१५ पायलटला किती पगार देते? ही रक्कम ऐकून तुम्हाला बसेल धक्का

मुंबई: अमेरिकेने इराणमध्ये अडकलेल्या आपल्या एफ-१५ पायलट्सला वाचवण्यासाठी एक मोहीम सुरू केली. ही मोहीम यशस्वी

David Warner: दारू पिऊन गाडी चालवणे पडले महागात; डेव्हिड वॉर्नरला अटक

नवी दिल्ली: पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज

Israeli Consulate Attack: इस्तंबूलमधील इस्रायली वाणिज्य दूतावासावर हल्ला

नवी दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, तुर्कीमधील इस्तंबूल

Iran-US-Israel War : अमेरिका - इस्रायलकडून इराणच्या १७ निवासी भागांवर बॉम्बहल्ले; विमानतळही उद्ध्वस्त

अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाचा (Iran-US-Israel War) आजचा ३९ वा दिवस आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी