मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात ७ दिवसीय माघी गणेशोत्स..

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात आज आपल्याला प्रचंड प्रमाणात भाविकांची गर्दी दिसून येते. आज माघी गणपती जयंती असल्यामुळे मोठया संख्येने भाविक इथे जमलेले दिसतात. सिद्धिविनायक मंदिरात ७ दिवसांपासून माघी गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून हा उत्सव २५ जानेवारीपर्यंत साजरा केला जाणार आहे. माघी गणेश उत्सव श्री गणेशाच्या जन्माशी संबंधित आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते, ज्याला माघी गणेश उत्सव असेही म्हणतात. या तिथीला वरद चतुर्थी आणि तिलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखले जाते.

गणेश पुराणानुसार, माघ शुक्ल चतुर्थी तिथीलाच श्री गणेशाचे वास्तविक प्रकटीकरण झाले होते. वर्ष २०२६ मध्ये गणेश जयंतीचा हा मुख्य सण आज २२ जानेवारी, गुरुवार रोजी साजरा केला जाणार आहे.

७ दिवसांचा माघी गणेश उत्सव

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि गोवा या राज्यांमध्ये साजरा केला जातो. या ७ दिवसांच्या उत्सवात गणपती बाप्पाची विधीवत प्रतिष्ठापना करून पूजा केली जाते आणि मोदकाचा नैवेद्य अर्पण केला जातो. उत्सवाच्या शेवटी मूर्तीचे विसर्जन केले जाते. गणेशाला ज्ञान, समृद्धी आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक मानले जाते. या उत्सवाचा मुख्य दिवस गणेश जयंती म्हणजेच माघ विनायक चतुर्थी असतो.

सिद्धिविनायक मंदिरात विशेष पूजा

या दिवशी सिद्धिविनायक मंदिरात विशेष पूजा केली जाते, पुजारी आचार्य पवन त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिरात हा उत्सव १९ ते २५ जानेवारी या कालावधीत साजरा केला जात आहे. दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी मंदिरात होत असून विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक भक्त आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी मंदिरात यज्ञ देखील करत आहेत.

 
Comments
Add Comment

Europe Heatwave 2026 : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! जूनमध्ये १६ हजारांहून अधिक मृत्यू; पुन्हा हीटवेव्हचा धोका

नवी दिल्ली : युरोपमध्ये यंदा तीव्र उष्णतेने मोठे संकट निर्माण केले आहे. जून महिन्यात जवळपास आठवडाभर सुरू

Sunday Mega Block : रविवारचा मेगाब्लॉक; मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वाहतुकीत बदल; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनंतर रविवारी, 16 ऑगस्ट रोजी मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर मेगाब्लॉकचा परिणाम

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक