Thursday, January 22, 2026

कल्याण-डोंबिवली महापालिकेत ५२ नवीन चेहरे

कल्याण-डोंबिवली महापालिकेत ५२ नवीन चेहरे

माजी महापौर-उपमहापौरांना धक्का

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागला असून या निकालात निवडलेल्या १२२ नगरसेवकांपैकी ५२ नवीन नगरसेवक निवडून आल्याने मतदारांनी नव्या चेहऱ्यांना पसंती दिल्याचे दिसून येत आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीमध्ये यंदा परिवर्तनाचे वारे वाहिले आहेत. निवडणुकीत महायुतीसह अन्य पक्षांतील काही उमेदवारांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवत दमदार विजयही संपादन केला आहे. त्यात अनघा देवळेकर, राहुल कोट, तेजश्री गायकवाड, रोहन कोट, रूपेश सकपाळ, किरण भांगळे, डॉ. तनुजा वायले, अपर्णा भोईर, स्वप्नाली केणे, संकेश भोईर, माया कांबळे, विशाल गारवे, दर्शना काळे, शामल गायकर, हेमलता पवार, गणेश लांडगे, रमीझ मणियार, समीना शेख, कांचन कुलकर्णी, अमित धाक्रस, मेघाली खेमा, रेश्मा निचळ, हर्मेश शेट्टी, सरिता निकम, ऐश्वर्या तांबोळी, स्नेहल मोरे, कीर्ती ढोणे, पूजा गायकवाड, सरोज राय, मधुर म्हात्रे, वंदना महिले, निलेश खंबायत, प्रणाली जोशी, कैलास जोशी, रंजना पेणकर, आसावरी नवरे, अभिजीत थरवळ, हर्षल मोरे, सूरज मराठे, प्रल्हाद म्हात्रे, रविना म्हात्रे, संदेश पाटील, डॉ. रसिका संदेश पाटील, रसिका कृष्णा पाटील, मृदुला नाख्ये, समीर चिटणीस, कविता म्हात्रे, आर्या नाटेकर, विजेयश्री म्हात्रे, सविता भोईर, स्नेहा भाने, पूजा म्हात्रे आदींचा समावेश आहे.

पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात असलेल्या अपर्णा भोईर या माजी महापौर वैजयंती घोलप यांना पराभूत करून जायंट किलर ठरल्या आहेत, तर राजकारणातील आणखी एक नवा चेहरा असलेल्या मधुर म्हात्रे हे माजी उपमहापौर विकी तरे यांना पराभूत करून जायंट किलर ठरले आहेत. याशिवाय अन्य ५२ चेहऱ्यांना मतदारांनी कौल देत एका नवीन पर्वाची सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे, तर या नवनिर्वाचित नवीन चेहऱ्याचे नगरसेवक आपल्या कामगिरी आणि, लोकांचे प्रश्न हाताळून समस्या सोडवून प्रभागाचा विकास करण्यात किती यशस्वी होतात हे आगामी काळात चित्र दिसणार आहे.

Comments
Add Comment