संत एकनाथ

काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल
काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल । नांदतो केवळ पांडुरंग ॥
भाव भक्ति भीमा उदक ते वाहे । बरवा शोभताहे पांडुरंग ॥
दया क्षमा शांति होये वाळुवंट । मिळालासे थाट वैष्णवांचा ॥
शान ध्यान पूजा विवेक आनंद । हाथि वेणुनाद शोभतसे ॥
दश इंद्रियांचा एक मेळा केला। ऐसा गोपाळकाला होत असे ॥
देही देखिली पंढरी बनी वनी । एका जनार्दनी वारी करी ॥


- डॉ. देवीदास पोटे


संतांना भक्तीचे अंतरंग उमगले होते. अध्यात्माचे सूत्र सापडले होते. वारकरी संवांनी सगुण भक्तीचा प्रारंभ करीत निगुर्णांच्या पातळीपर्यंत तिला उन्नत केले. अद्वैताचे तत्वज्ञान विशद करताना भक्त आणि देव किंवा आत्मा आणि परमात्मा है तत्त्व मांडले. ईश्वररूपी परतत्व आपल्या अंतरंगातच सामावलेले आहे. हा विचार त्यांनी, ठळकपणे मांडला.


या अभंगात संत एकनाथांनी हेच तत्त्व मांडले आहे. ते म्हणतात, "आपलं शरीर हेच पंढरपूर आणि आत्मा हाच विठ्ठल आहे. अंतरंगात केवळ विठ्ठलच नांदतो आहे.' भावभवती म्हणजे भीमा. तिच्यातून निर्मळ पाण्याचा प्रवाह वाहतो आहे. हो जणू विठ्ठलच शोभतो आहे, पंढरपूरचे वाळवंट म्हणने दया, क्षमा, शांती. या वाळवंटात वैष्णवजनांचा थाट उडाला आहे. टाळमृदंगाच्या ध्वनीने हरिनामाचा कल्लोळ उडाला आहे. दिंड्यापताकांनी सारे आसमंत व्यापून गेले आहे.'


ज्ञान, ध्यान, पूजा आणि विवेक अशा सर्व परींनी आनंदाच्या सरी बरसत आहेत. हा जणू वेगुनाद शोभतो आहे. दहा इंद्रियाचा एकच मेळ जमून आला आहे, दाही इंद्रिये एका सूत्रात बांधली गेली आहेत. देहाने जनात, वनात पंढरपूर पाहिले. आता वारी करावी."


माणसाच्या अंतरंगातच पंढरपूर आणि विठ्ठल आहे. "वारी करणे" याचा अर्थ अपूर्णतेकडून पूर्णत्वाकडे प्रवास करणे. हा प्रवास बाहेरचा नसू्न आतला आहे.


हा स्वतः स्वतःचा घेतलेला शोध आहे. ही तिमिसकडून तेजाकडे जाणारी वाटवाल आहे.


संतांची विचारदृष्टी विवेकपूर्ण आणि व्यापक आहे. त्यांच्या भक्तीला ज्ञानाची डोळस बैठक होती. "देव देहात नांदतो" हे विश्वात्मक सत्य त्यांनी आपल्या अभंगवाणीतून प्रतिपादन केले, निर्मळ हृदयात देवाचा निवास असतो. माणूस हे देवाचेच रूप आहे. देव आणि मी एकच आहे हा ‘सोड हं’ या महावाक्यातील विचार संत एकनाथांनी या अभंगाद्वारे मांडला आहे.

Comments
Add Comment

एकमेका साह्य करू। अवघे धरू सुपंथ ॥

कोण जाणे कैसी परी। पुढे उरी ठेविता ।। अवघे धन्य होऊ आता। स्मरविता स्मरण ॥ तुका म्हणे अवधी जोडी। वे आवडी चरणांची

संत ज्ञानेश्वर

माझे जीवीची आवडी माझे जीवीची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी ।। पांडुरंगी मन रंगले । गोविंदाचे गुणी वेधले ।। जागृति

संत भावंडीबाई

आईबापा पोटी कन्या हो जन्मता आईबापा पोटी कन्या हो जन्मता खिन्न वाटे चित्ता सर्व जना | परंतु कन्येचे महत्व हो थोर

समर्थ रामदास

आधी प्रपंच करावा नेटका आधी प्रपंच कराना नेटका। मग घ्यावे परमार्थ विवेका। येथे आळस करू नका । विवेकी हो ।। दासबोधः

संत एकनाथ

वारियाने कुंडल हाले वारियाने कुडल हाले । डोळे मोडित राधा चाले ।। राधेला पाहुनि भुलले हरी । बैल दुभवी नंदाघरी

संत ज्ञानेश्वर

आणि इच्छिलिया सांगडे आणि इच्छिलिया सांगडे | इंद्रिया आमिष न जोडे | ऐसा जो ठावे पडे | तोचि