श्री सिद्धिविनायक मंदिरात ‘माघी गणेश जयंती महोत्सवा'स सुरुवात

गायन, वादन, शोभायात्रांसह आठवडाभर चालणार धार्मिक सोहळा


मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात २२ जानेवारीला होणाऱ्या माघी गणेश जयंतीनिमित्त माघ श्री गणेश जयंती महोत्सवाचे आयोजन केले आहे. सोमवारपासूनच या महोत्सवाला सुरुवात झाली आहे. १९ जानेवारी ते रविवार, २५ जानेवारीपर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील नामवंत कलाकार या महोत्सवात सहभागी होणार आहेत.


या महोत्सवादरम्यान, श्री सिद्धिविनायक मंदिरात दररोज पहाटे सकाळी ५ ते ५.३० दरम्यान काकड आरतीने धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात होईल. त्यानंतर दिवसभर महानैवेद्य, नमस्कार, अभिषेक तसेच अन्य विधी पार पडतील. सायंकाळी लोकनृत्य, भजन, शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्य आणि वाद्यसंगीत अशा विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


विविध कलाकारांचे सादरीकरण : सोमवारी सायंकाळी प्रसिद्ध तालवादक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते शिवमणी यांचे सादरीकरण करण्यात आले. मंगळवारी बासरीवादनाचे ज्येष्ठ कलाकार पंडित राकेश चौरसिया यांची बासरी मैफल होईल. संध्याकाळी ओडिसी नृत्यप्रकाराचे सादरीकरणही होणार आहे. बुधवारी प्रसिद्ध सतारवादक पंडित निलाद्री कुमार यांचा सतारवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रघुनाथ फडके यांचे गीत रामायण सादरीकरणही होणार आहे.


२२ तारखेला भव्य रथ शोभायात्रा : २२ जानेवारीला मुख्य माघी गणेशोत्सवाचा सोहळा पार पडणार आहे. यासाठी दुपारी ३ वाजता भव्य रथ शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यावेळी भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळ्या रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. शुक्रवारी, २३ जानेवारी रोजी पद्मश्री पुरस्कार विजेते विजय घाटे यांचे तबलावादन होईल.

Comments
Add Comment

मुंबईत आतापर्यंत सुमारे ८८ टक्के मालमत्ता कर वसुली

मुंबई: मंगळवार २४ मार्च २०२६ पर्यंत एकूण ६ हजार ४४९ कोटी रुपये म्हणजेच निर्धारित उद्दिष्टाच्या ८७.८६ टक्के इतका

मुंबईतील चारही प्रवेशद्वार सुशोभीकरणाची संकल्पना पुढील १५ दिवसात सादर करा; महापौर रितू तावडे यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई: मुंबईतील दहिसर, वाशी, ऐरोली आणि मुलुंड येथील प्रवेशद्वारांची उभारणी, सुशोभीकरणासह परिसर व पर्यटन

मुंबईतील मालमत्‍ता कराच्‍या वसुलीसाठी मुंबई महानगरपालिका अधिनियमात सुधारणा

मुंबई: मुंबईमधील मालमत्‍ता कराच्‍या वसुलीसाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ चे कलम १५४ मध्‍ये सुधारणा

मेट्रो-११ मार्गिकेच्या कामाला वेग, 'जायका'कडून ५ हजार ५०० कोटींचे कर्ज

मुंबई : वडाळ्यातील आणिक आगार ते गेटवे ऑफ इंडिया या भुयारी मेट्रो ११ मार्गिकेतील आर्थिक अडचणी आता दूर होणार आहेत.

तीन कोटींपेक्षा अधिक मुद्रांक शुल्क बुडविल्याप्रकरणी मुंबईचे सह-दुय्यम निबंधक निलंबित

मुंबई : शासनाचे ३ कोटी ८२ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) बुडवून नियमबाह्य नोंदणी केल्याप्रकरणी

आरेतील बेकायदा बांधकामांवर आता 'सॅटेलाईट' नजर; 'नेत्रम' ॲपद्वारे अतिक्रमणांचा होणार बिमोड

पालकमंत्री आशिष शेलार यांची विधान परिषदेत माहिती; दोषी अधिकाऱ्यांवरही उगारणार बडगा मुंबई : आरे दुग्ध