मुंबईत उबाठाला निवडणुकीनंतर पहिला मोठा धक्का, 'या' पहिल्या महिला नगरसेविकाचा होणार शिवसेनेत प्रवेश

मुंबई : महापालिका निवडणुकांनंतर ठाकरे गटाला मुंबईत पहिलाच मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक १५७ मधून निवडून आलेल्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के यांच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्या उबाठाच्या अधिकृत बैठकींपासून दूर राहिल्याने आणि हालचालींमध्ये सहभागी न झाल्याने त्यांच्या पक्षनिष्ठेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


महापालिकेत सत्तास्थापनेसाठी शिंदे गट आणि भाजपकडून हालचालींना वेग आला असताना, इतर पक्षांतील नगरसेवकांशी संपर्क वाढवला जात असल्याची चर्चा आहे. अशाच पार्श्वभूमीवर डॉ. सरिता म्हस्के या शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. विशेष म्हणजे उबाठाच्या नगरसेवकांची बैठक आणि गटनोंदणीसाठी नवी मुंबईला जाण्याच्या प्रक्रियेत त्या अनुपस्थित राहिल्याने संशय अधिक वाढला आहे.


डॉ. सरिता म्हस्के यांनी निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांचा हा संभाव्य निर्णय उबाठासाठी धक्का मानला जात आहे. जर त्या अधिकृतपणे गट बदलल्यास उबाठाच्या नगरसेवकांची संख्या कमी होऊन पक्षाची ताकद कमी होणार आहे.


मुंबईबरोबरच कल्याण-डोंबिवलीतही काही नगरसेवकांनी वेगळी भूमिका घेतल्याने उबाठाच्या अडचणी वाढल्या आहेत. या सर्व घडामोडींमुळे महापालिकेतील राजकारण अधिकच तापले असून पुढील काही दिवसांत सत्तासमीकरणे नेमकी कुठल्या दिशेने जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

समुद्रात मासे कमी आणि कचराच जास्त; महापालिका सभागृहात कोळी समाजाच्या नगरसेवकांना मांडावी लागली व्यथा

मुंबई: मुंबईत सध्या मोठ्याप्रमाणात समुद्रातील कचरा आणि मलमिश्रित पाणी जात असल्यामुळे नगरसेवकांनी तीव्र चिंता

Sonia Gandhi: सोनिया गांधींची प्रकृती बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक मंगळवारी रात्री

मुंबईतील बांधकामे सिल करा, विकासकांना टाका काळ्या यादीत; मुंबई महापालिकेची भूमिका

मुंबई: मार्च महिना संपत असल्यामुळे महापालिका प्रशासनाच्यावतीने मालमत्ता कराची वसूली जोरात सुरु असून ज्या

मिरा-भाईंदरमध्ये अग्नितांडव; ४ ते ५ इमारती आगीच्या विळख्यात

मुंबई: मुंबईजवळील मिरा-भाईंदरमधील प्लेझंट पार्क परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये ४ ते ५

'मत्स्य उत्पादन आणि जलवाहतुकीत महाराष्ट्र वर्षभरात पहिल्या तीन राज्यांत असेल'

मंत्री नितेश राणे यांची विधानसभेत ग्वाही; मुंबई महानगरात लवकरच ६ जलमार्ग सुरू करणार किनारपट्टीची सुरक्षा आणि

आरोग्य समिती अध्यक्षांचा पहिला वहिला अनोखा प्रयोग

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांची माहिती आरोग्य समितीच्या