रेडिओ क्लब जेट्टीचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास कंत्राटदारावर कारवाई करणार - मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांचा इशारा

मुंबई : बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबनजीक असलेल्या जेट्टीचे काम निविदेतील कालमर्यादेत करण्यात यावे. जेट्टीचे काम विहीत कालावधीत पूर्ण होऊन नागरिकांसाठी वॉटर टॅक्सी सेवेत आणण्यासाठी या कामाला वेग द्यावा. जेट्टीच्या कामात २५  फेब्रुवारीपर्यंत गती न दिसल्यास कंत्राटदारावर कारवाई करावी, असे निर्देश मत्सव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी बुधवारी दिले.


रेडिओ क्लब जेट्टीच्या कामाबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये, उपजिल्हाधिकारी अंजली भोसले, मुख्य बंदरे अधिकारी खराह आदी उपस्थित होते.


रेडिओ जेट्टीचे काम पूर्ण झाल्यानंतर येथून नवी मुंबईसाठी वॉटर टॅक्सी सेवा सुरू करावयाची आहे. त्यादृष्टीने या प्रकल्पाचे काम कुठल्याही प्रकारे रखडता कामा नये. जेट्टीच्या कामात २५  फेब्रुवारीपर्यंत गती न दिसल्यास कंत्राटदारावर कारवाई करावी. निविदेत दिलेल्या कालावधीत जेट्टीचे काम पूर्ण करण्यात यावे. या कामाचा प्रत्येक आठवड्यात प्रगती अहवाल सादर करावा, असे निर्देशही मंत्री नितेश राणे यांनी दिले.
रेडिओ क्लब जेट्टीचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातून नवीन जलमार्ग विकसित होतील. त्यामुळे नागरिकांना अधिक जलमार्गाचा पर्याय देऊन नवी मुंबईला थेट जोडणी देता येईल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी आणि तेथून दक्षिण मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीचे होईल, असेही बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : 'आरटीओ' विभागातील गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी

 मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा; बजरंग खरमाटे प्रकरणात 'एसआयटी' स्थापन मुंबई : प्रादेशिक परिवहन (आरटीओ)

Narhari Zirwal : हाफकिनच्या आधुनिकीकरणासाठी २५ कोटींचा निधी मंजूर!

 खाजगी भागीदारीचा विचार नाही; मंत्री नरहरी झिरवाळ यांचे सकारात्मक स्पष्टीकरण मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेत

कातळशिल्पांचे संरक्षण करुनच विकास प्रकल्पांचा विचार करणार, मंत्री आशिष शेलारांनी दिली ग्वाही

मुंबई: मानवी उत्क्रांतीच्या इतिहासाचे महत्त्वाचे पुरावे असलेल्या कोकणातील कातळ शिल्पांचे पुर्ण संरक्षण करुनच

Powai Lake crocodile : पवई तलावाजवळील रहिवासी भागात मगर शिरली; वन विभागाच्या पथकाकडून सुखरूप रेस्क्यू

मुंबई : पवई तलावालगतच्या मोरारजी नगर परिसरात मंगळवारी सुमारे सात फूट लांबीची मगर ( Powai Lake crocodile)आढळल्याने परिसरात

Police Suicide : मुंबईच्या लोकभवनात SRPF जवानाची आत्महत्या; गार्ड ड्युटीवर असताना सर्व्हिस रायफलमधून झाडली गोळी

मुंबई : मलबार हिल (Malabar Hill) येथील लोकभवन (Lokbhavan) परिसरात सोमवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. राजभवनाच्या सुरक्षेसाठी

Maharashtra school holiday : मुसळधार पावसाचा इशारा; मुंबईसह अनेक जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा कायम असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आणि