मोहित सोमण:आज जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सोन्याचांदीत गगनभेदी वाढ झाली आहे. युएसने ग्रीनलँडवर कब्जा करण्याच्या तयारीमुळे जागतिक गुंतवणूकदारांमध्ये दिवसभरात अस्थिरता कायम होती. युएसने आपले मिलेट्रीचे युद्धविमान ग्रीनलँडच्या दिशेने रवाना केले असताना आणखी अस्थिरता वाढली. दुसरीकडे मात्र जगभरात सुरू झालेल्या बोलण्या, विरोध पाहता तात्पुरती युएसने आपले विमान अर्ध्यातून परतल्याने बाजारात किंचित दिलासा मिळाला असला तरी कमोडिटीतील वादळी वाढ कायम होत आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ७४८ रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ६८५ रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ५६० रूपयांनी वाढ झाली आहे त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १५७२६ रूपये, २२ कॅरेटसाठी १४४१५ रूपये, १८ कॅरेटसाठी ११७९४ रूपयांवर पोहोचले आहेत. प्रति तोळा दर पाहिल्यास २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात थेट ७४८० रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ६८५० रूपये व १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ५६०० रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १५७२६०, २२ कॅरेटसाठी १४४१५०, १८ कॅरेटसाठी ११७९४० रूपयांवर पोहोचले आहेत.
मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १५७२६, २२ कॅरेटसाठी १४४१५, १८ कॅरेटसाठी ११७९४ रूपयांवर पोहोचले. तर भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) सोन्याचे दर संध्याकाळपर्यंत ४.६७% वाढल्याने १५७५९३ रूपयांवर व्यवहार करत आहे. आज जगभरातील सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत २.०४% वाढ झाल्याने दरपातळी ४८६३.९० डॉलर प्रति औंसवर गेली आहे. दरम्यान, रूपयांच्या तुलनेत डॉलर वाढला असला तरी कमोडिटी बाजारात डॉलरमध्ये कमकुवत वाढ झाल्याने कमोडिटीत दबाव वाढला होता.
एकीकडे ग्रीनलँडशी संबंधित वाढता तणाव आणि नव्याने निर्माण झालेल्या व्यापारविषयक संघर्षांमुळे जागतिक बाजारपेठा हादरल्या आणि गुंतवणूकदार सुरक्षित मालमत्तांकडे वळल्याने, सोन्याच्या किमती आज नवीन विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या असून आता त्या प्रतिऔंस ४९०० डॉलरच्या पातळीजवळ पोहोचल्या आहेत. दिवसाच्या सुरुवातीला सोन्याने ४८७३.५० डॉलर प्रति औंसवरचा नवा सर्वकालीन उच्चांक गाठला. उपलब्ध माहितीनुसार,अमेरिकन सोन्याच्या वायदा बाजारातील किमतीही २.४% नी वाढून ४८८०.५० डॉलर प्रति औंसच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचल्या.आजच्या वाढीसह, या आठवड्यात सोन्याच्या किमती ६% पेक्षा जास्त वाढल्या आहेत. त्यामुळे वाढलेले सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचे स्थान अधोरेखित होते. ग्रीनलँडच्या भौगौलिक महत्व असल्याने अमेरिका आणि युरोपमधील संबंध तणावपूर्ण राहिल्याने ही सातत्याने वाढ झाली आहे,अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आर्क्टिकमधील सुरक्षाविषयक चिंतांचा हवाला देत ग्रीनलँडच्या बाबतीत माघार नाही असे ठामपणे सांगितले आहे आणि युरोपीय देशांवर शुल्क लावण्याची धमकी दिली आहे ज्यामुळे जागतिक व्यापार जोखमींमुळे आधीच चिंतेत असलेल्या बाजारपेठांमध्ये आणखी अस्थिरता निर्माण झाली आहे.
आजच्या बाजारातील सोन्याच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'सोन्याचा व्यापार अत्यंत तेजीत झाला, किंमत जवळपास ७००० रूपयाने वाढून १५७५०० पातळीवर पोहोचली. यासह सोन्याची तीव्र तेजी कायम राहिली असून, केवळ तीन सत्रांमध्ये किमतीत १५००० पेक्षा जास्त वाढ झाली आहे आणि जानेवारी २०२६ मध्येच सोन्याच्या किमतीत जवळपास १५% वाढ झाली आहे. अमेरिका, ग्रीनलँड, युरोप, रशिया-युक्रेन यांसारख्या अनेक आघाड्यांवर वाढलेल्या भूराजकीय तणावामुळे सुरक्षित मालमत्तांकडे धाव घेण्याचे प्रमाण वाढले आहे, ज्यामुळे अनिश्चितता आणि डॉलरच्या अस्थिरतेविरुद्ध सोन्याला पसंतीची गुंतवणूक मानली जात आहे. सध्याचे जोखमीचे वातावरण सोन्यासाठी अनुकूल आहे, ज्यामध्ये प्रमुख आधार पातळी १४५००० रूपयांच्या जवळ आहे आणि विस्तारित प्रतिरोध पातळी १६१००० रूपयांच्या आसपास दिसत आहे.'
दुसरीकडे चांदीतही गगनभेदी वाढ -
सोन्याच्या दराप्रमाणेच आज चांदीच्या दरातही वादळी वाढ झाली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात १० रूपये प्रति किलो दरात १०००० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर ३३० प्रति किलो दर ३३०००० रूपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे आज सराफा बाजारात प्रति १० ग्रॅम सरासरी दर मुंबईत ३३०० रूपयांवर असून एक किलोमागे दर ३३००० रूपयांवर पोहोचले. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत २.९४% वाढ झाल्याने दरपातळी ३३३१७७ रूपयांवर पोहोचले आहेत. जागतिक अस्थिरतेचा परिपाक म्हणून चांदीच्या सिल्वर फ्युचर निर्देशांकात थेट २% वाढ झाली.युरोपजवळील अमेरिकन आर्थिक मालमत्तेचा मोठा साठा वाढत्या व्यापार संघर्षात सौदेबाजीसाठी वापरला जाऊ शकतो ज्यामुळे जोखीम टाळण्याची प्रवृत्ती वाढली असे तज्ञांनी यावेळी स्पष्ट केले. एकीकडे चांदीला संरचनात्मक पुरवठ्यातील कमतरता आणि प्रत्यक्ष उपलब्धतेतील टंचाईचा फायदा होत असताना किंमतीत दिसतो.
चांदीच्या किमतींमधील तेजी कायम राहिली असून मजबूत सुरक्षित गुंतवणुकीच्या मागणीमुळे तसेच अमेरिकेत त्याला एक महत्त्वपूर्ण खनिज म्हणून घोषित केल्यामुळे, चांदीचे दर ४.३२% वाढून ३२३६७२ पातळीवर गेले होते ज्यात आता आणखी वाढ अपेक्षित व्यक्त केली जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड मिळवण्याच्या प्रयत्नांना पुन्हा चालना दिल्यामुळे आणि आठ युरोपीय राष्ट्रांवर शुल्क लावण्याच्या धमक्यांमुळे वाढलेल्या अमेरिका-युरोपमधील तणावामुळे मौल्यवान धातूंमधील गुंतवणूक जागतिक गुंतवणूकदारांनी जोखीम म्हणून वाढवली.