‘शिवसेना’ आणि धनुष्यबाण कुणाचा?

सर्वोच्च न्यायालयात उद्या अंतिम सुनावणी


राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'घड्याळा'बाबतही होणार फैसला


मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा आणि दोन महत्त्वाच्या प्रादेशिक पक्षांच्या भवितव्याचा पेच आता सर्वोच्च न्यायालयात सुटण्याच्या मार्गावर आहे. शिवसेना पक्ष आणि 'धनुष्यबाण' या निवडणूक चिन्हाबाबत येत्या बुधवारपासून अंतिम सुनावणीला सुरुवात होत आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ सलग दोन दिवस या प्रकरणाचा युक्तिवाद ऐकून घेणार असून, राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा निकाल लवकरच जाहीर होण्याची चिन्हे आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हावर देखील सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.


विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये उबाठाविरोधात उघड बंड केले होते. त्यांनी आपल्या समर्थक आमदारांसह प्रथम गुजरात व तेथून गुवाहाटीला प्रयान केले होते. शिंदे यांनी नंतर आपल्या समर्थक आमदार व खासदारांच्या संख्याबळाच्या आधारावर शिवसेना पक्ष व चिन्हावर दावा सांगितला होता. त्यासंबंधीचा कायदेशीर लढा केंद्रीय निवडणूक आयोगापुढे झाला. त्यात आयोगाने संख्याबळाच्या आधारावर शिवसेना पक्ष व चिन्ह हे उद्धव ठाकरे यांच्याकडून काढून शिंदे यांच्या गटाला दिले. या निर्णयाला उबाठा सेनेने र्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यासोबतच, शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्याऐवजी पात्र ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयालाही शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आव्हान दिले असून, या दोन्ही याचिकांवर आता बुधवारी एकत्र सुनावणी होणार आहे. या प्रकरणी नोव्हेंबरमध्ये मागील सुनावणी झाली होती. त्या सुनावणीवेळीच न्यायालयाने अंतिम सुनावणीची तारीख निश्चित केली आहे.


‘राष्ट्रवादी’ आणि ‘घड्याळा’बाबत सुनावणी


दुसरीकडे, शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ‘घड्याळ’ चिन्हाचा वादही सर्वोच्च न्यायालयाच्या अजेंड्यावर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष व चिन्हाबाबत याचिका दाखल केली असून, अजित पवार गटाच्या आमदारांना पात्र ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला जयंत पाटील यांनी आव्हान दिले आहे. शिवसेनेच्या युक्तिवादानंतर राष्ट्रवादी प्रकरणाची सुनावणी घेतली जाणार आहे.

Comments
Add Comment

बहुभाषिक चेहऱ्यातही मराठी टक्का भक्कम

मुंबई : महापालिकेच्या निकालाचे आकडे मुंबईच्या बदलत्या राजकीय आणि सामाजिक समीकरणावर शिक्कामोर्तब करीत आहेत.

‘एमआयएम’चे तेलंगणात ६७, तर महाराष्ट्रात शंभरहून अधिक नगरसेवक…

मुंबई : ‘एमआयएम’ या पक्षाचे आता तेलंगणापेक्षा महाराष्ट्रात अधिक नगरसेवक आहेत. तेलंगणामध्ये केवळ ६७ नगरसेवक

मुंबई महापालिकेत महिला नगरसेवकांचे स्पष्ट बहुमत!

२२७ प्रभागांमध्ये १३० नगरसेविका विजयी मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण

मुंबईत ८७ हजार मतदारांची ‘नोटा’ला पसंती

मुंबई महापालिकेत पाचव्या क्रमाकांवर नोटाला मतदान मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत यंदा अनेक

महापौरपदासाठी भाजप-शिवसेनेतच खरी चुरस!

महापौरांच्या खुर्चीवर पिठासिन अधिकारी म्हणून श्रद्धा जाधव यांच्या नावाची चर्चा मुंबई : महापौरपदाचे आरक्षण

मुंबईच्या महापौरपदाचा ७५ वर्षांचा प्रवास

शहराच्या बदलत्या इतिहासाचे साक्षीदार मुंबई : मुंबई महापालिकेच्या महापौरपदाचा गेल्या ७५ वर्षांचा प्रवास हा