Tuesday, January 20, 2026

भारत-पाकिस्तान यांच्यात १५ फेब्रुवारीला क्रिकेटचे दोन सामने

भारत-पाकिस्तान यांच्यात  १५ फेब्रुवारीला क्रिकेटचे दोन सामने

आयसीसी टी-२० मध्ये महामुकाबला होणार

मुंबई : क्रिकेट चाहत्यांना कायमच भारत विरुद्ध पाकिस्तान या २ देशांच्या क्रिकेट संघात होणाऱ्या सामन्याची प्रतीक्षा असते. भारतात आणि श्रीलंकेत ७ फेब्रुवारीपासून आयसीसी टी-२० आय वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेदरम्यान भारतीय संघाविरुद्ध पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. हा सामना १५ फेब्रुवारीला होणार आहे. विशेष बाब म्हणजे १५ फेब्रुवारी या एकाच दिवशी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात २ सामने होणार आहेत.

एसीसी अर्थात आशियाई क्रिकेट काउन्सिलने सोमवारी १९ जानेवारीला आशिया कप रायजिंग स्टार्स वूमन्स टी-२० स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या स्पर्धेत एकूण ८ संघ भिडणार आहेत. या ८ संघांना ४-४ नुसार २ गटांत विभागण्यात आले आहे.

भारत-पाकिस्तानमध्ये होणारे कसोटी, एकदिवसीय, टी-२० कोणताही सामना असो, प्रत्येक सामना खेळाडूंच्या खेळामुळे हा ‘हायव्होल्टेज’ बनत असल्याचे गेल्या काही वर्षांमध्ये पाहावयास मिळालेले आहे. दोन्ही संघातील खेळाडूंवर त्या त्या देशातील प्रेक्षकांचाही कमालीचा दबाव असतो.

स्पर्धेला १३ फेब्रुवारीपासून सुरुवात

या स्पर्धेत १३ ते १८ फेब्रुवारी दरम्यान साखळी फेरीचा थरार रंगणार आहे. साखळी फेरीत प्रत्येक संघाला ३ सामने खेळायचे आहेत. त्यानंतर दोन्ही गटांतील अव्वल २ असे एकूण ४ संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. साखळी फेरीत दररोज २ सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यानुसार दिवसातील साखळी फेरीतील पहिल्या सामन्याला स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता सुरुवात होईल, तर साखळी फेरीतील दुसऱ्या सामन्याचा थरार दुपारी २ पासून रंगणार आहे. हीच वेळ उपांत्य फेरीसाठीही असणार आहे. थायलंड वेळेबाबत भारताच्या तुलनेत ९० मिनिटांनी पुढे आहे. त्यानंतर २० फेब्रुवारीला उपांत्य फेरीतील दोन्ही सामने खेळवण्यात येणार आहेत. ए १ विरुद्ध बी २ यांच्यात पहिला सामना खेळवण्यात येईल. तर बी १ विरुद्ध ए २ सेमी फायनलमधील दुसऱ्या सामन्यात आमनेसामने असतील, तर रविवारी २२ फेब्रुवारीला विजेता संघ निश्चित होईल. ही स्पर्धा टी-२० फॉर्मेटने खेळवण्यात येणार आहे.

कोणते संघ कोणत्या गटात?

या स्पर्धेचे आयोजन बँकॉक-थायलंडमध्ये करण्यात आले आहे. भारत ए आणि पाकिस्तान ए यांचा समावेश ए ग्रुपमध्ये करण्यात आला आहे. तसेच या ए ग्रुपमध्ये यूएई आणि नेपाळच्या प्रमुख संघाचा समावेश करण्यात आला आहे. तर बी ग्रुपमध्ये बांगलादेश श्रीलंकेच्या अ संघांचा समावेश करण्यात आला आहे. सोबतच या ग्रुपमध्ये मलेशिया आणि यजमान थायलंडच्या मुख्य संघाचा समावेश आहे.

वूमन्स आशिया कप रायजिंग स्टार्स स्पर्धेचे वेळापत्रक

  • इंडिया ए वुमन्स टीमचे वेळापत्रक
  • विरुद्ध यूएई, शुक्रवार, १३ फेब्रुवारी
  • विरुद्ध पाकिस्तान ए, रविवार, १५ फेब्रुवारी
  • विरुद्ध नेपाळ ए, मंगळवार, १७ फेब्रुवारी
Comments
Add Comment