महापौरपदासाठी भाजप-शिवसेनेतच खरी चुरस!

महापौरांच्या खुर्चीवर पिठासिन अधिकारी म्हणून श्रद्धा जाधव यांच्या नावाची चर्चा


मुंबई : महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाल्यावर खऱ्या अर्थांने राजकीय चुरस वाढीस लागणार आहे. महापालिका स्थापनेनंतर प्रथमच भाजपचे सर्वांधिक नगरसेवक निवडून आले आहे. त्यामुळे महापालिकेत प्रथमच भाजपचा महापौर विराजमान करण्यासाठी भाजपकडून आटोकाट प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. सर्वांधिक नगरसेवक विजयी होऊनही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्ता मिळविण्यासाठी त्यांना शिवसेनेच्या मदतीची गरज लागणार आहे. भाजपच्या याच अगतिकतेचा फायदा उचलत शिवसेनाही अडीच वर्षांकरीता महापौरपदाची मागणी करत आहे. महापौर निवडीला अजून काही दिवसांचा कालावधी असल्याने फोडाफोडीच्या राजकारणाला तसेच घोडेबाजाराला गती मिळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


मुंबईच्या महापौर पदासाठी येत्या २२ जानेवारी रोजी आरक्षण लॉटरी सोडत काढली जाणार असून त्यामुळे महापौर पदासाठी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, या महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये पिठासीन अधिकारी म्हणून महापालिकेच्या वरिष्ठ नगरसेवकाची नियुक्ती केली जाते. त्यामुळे महापालिकेत सलग सात वेळा निवडून येण्याचा मान हा माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.


तसेच झाल्यास महापौर निवडीदरम्यान महापौर पदाच्या खुर्चीवर पिठासीन अधिकारी म्हणून श्रद्धा जाधव बसतील आणि निवडणुकीची प्रक्रिया पार पाडतील. मात्र महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार असल्याने विरोधी पक्षाच्या उमेदवाराला पिठासीन अधिकारी म्हणून स्वीकारण्यास भाजप आणि शिवसेना तयार होईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.


मुंबई महापालिकेत महापौरांच्या निवडीवरून जोरदार खलबते सुरू असून महापौर कुणाचा होणार यावरून माध्यमांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. त्यातच महापौरांचे आरक्षण न पडल्याने कोणत्या आरक्षित प्रवर्गातील नगरसेवकाची वर्णी लागणार आणि कोणत्या पक्षाची दावेदारी असणार याबाबत कोणतीही स्पष्टता नाही; परंतु आता याबाबत येत्या २२ जानेवारी आरक्षण सोडत काढली जाणार असल्याने कोणत्या प्रवर्गाचे आरक्षण निघते याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र येत्या २२ जानेवारी रोजी आरक्षण सोडत काढली गेल्यानंतर किमान सात दिवसांचा कालावधी विशेष सभेसाठी आवश्यक असल्याने तसेच उमेदवाराला अर्ज भरण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी असणे यासाठीचा अवधी आणि साप्ताहिक सुट्टी तसेच बँक हॉलिडे वगळता ३१ जानेवारीपूर्वी महापौर निवडणूक होणे शक्य होणार नाही. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवठ्यात महापौरपदाची निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


निवडणूक प्रक्रिया कोणाच्या माध्यमातून राबविणार?


दरम्यान, ही निवडणूक घेण्यासाठी यापूर्वी मावळते महापौर हे पिठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहत होते; परंतु महापालिकेची मुदत संपून पावणेचार वर्षे संपत आल्याने महापालिकेच्या अधिनियमातील तरतुदीनुसार महापौरांच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्वांत जास्तवेळा तथा ज्येष्ठ नगरसेवक हा पिठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहतील असा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे सभागृहात सर्वांत ज्येष्ठ नगरसेवक या उबाठाच्या श्रद्धा जाधव असल्याचे त्यांच्या नावाची घोषणा महापालिका सचिवांना निवडणुकीच्या दिवशी करून त्यांना पिठासीन अधिकारी म्हणून नियुक्त करावे लागणार आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे श्रद्धा जाधव यांना महायुतीचे नगरसेवक स्वीकारतील का? महायुतीतील ज्येष्ठ नगरसेवकाला पिठासीन अधिकारीपदी बसवणार की आयुक्तांच्या माध्यमातूनच ही निवडणूक पार पाडायला भाग पाडली जाईल याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले
जात आहेत.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य