Pune News :पोलीस भरतीच स्वप्न मोडलं..पोलीसात भरती न झाल्याने युवकाचं टोकाच पाऊल

पुणे :पोलीस बनण्याच स्वप्न घेऊन युवक पुण्याला आला आणि राहत्या घरी घेतला गळफास घेतला...ही घटना पुण्यामध्ये शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे घडली आहे.हा २२ वर्षीय तरुण साताऱ्यावरुन पोलीस भरतीसाठी पुण्यामध्ये आला होता. मात्र पोलीस भरतीत निवड न झाल्यामुळे मित्राच्या खोलीवर वास्तव्यास असताना या तरुणाने गळफास घेऊन आपली जीवन संपवलं.

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळच्या सुमारास विरू याने कोणाचेही लक्ष नसताना अचानक गळफास लावून घेतला. मित्रांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अंगावर खाकी वर्दी चढवण्याचे स्वप्न उराशी बाळगून मैदानावर घाम गाळणाऱ्या या उमद्या तरुणाने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिक्रापूर पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची (एडीआर) नोंद केली असून अधिक तपास हवालदार बापू हाडगळे करत आहेत. या घटनेमुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे
Comments
Add Comment

गोव्यात १५ रशियन महिला हत्याकांडाचा उलगडा; आरोपी अलेक्सी लियोनोवची हादरवून टाकणारी कबुली

गोवा : गोव्यात उघडकीस आलेल्या रशियन महिलांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. उत्तर गोव्यातील अरंबोल

सात रुपयांचे चोरी प्रकरण; ५० वर्षांपूर्वीचा खटला बंद

मुंबई : ७ रुपयांच्या चोरीच्या घटनेनंतर जवळपास ५० वर्षांनी मुंबईतील एका न्यायालयाने अखेरीस १९७७ सालच्या एका

माथेरानमध्ये धारदार शस्त्रांचा धाक दाखवून लूट

कदम दाम्पत्याला दोरीने बांधून चोरटे फरार माथेरान (वार्ताहर): पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये टी स्टॉलवर

गोव्यात दोन रशियन महिलांची एकाच पद्धतीने हत्या

गोवा : गोव्यामध्ये दोन रशियन महिलांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. सुरुवातीला पोलिसांना रशियन महिला

‘क्रिप्टो’च्या नावाने ९० लाख लुटले!

एमआयडीसी पोलिसांकडून तीन आरोपींना अटक मुंबई : क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने एका कापड

मुलाने जन्मदात्या आईलाच बंदुकीने गोळी मारून संपविले

अणसूर मडकीलवाडीत खळबळजनक घटना वेंगुर्ले : वेंगुर्ला तालुक्यातील अणसूर मडकीलवाडी येथे मुलानेच जन्मदात्या आईवर