पुणे :पोलीस बनण्याच स्वप्न घेऊन युवक पुण्याला आला आणि राहत्या घरी घेतला गळफास घेतला...ही घटना पुण्यामध्ये शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे घडली आहे.हा २२ वर्षीय तरुण साताऱ्यावरुन पोलीस भरतीसाठी पुण्यामध्ये आला होता. मात्र पोलीस भरतीत निवड न झाल्यामुळे मित्राच्या खोलीवर वास्तव्यास असताना या तरुणाने गळफास घेऊन आपली जीवन संपवलं.
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळच्या सुमारास विरू याने कोणाचेही लक्ष नसताना अचानक गळफास लावून घेतला. मित्रांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अंगावर खाकी वर्दी चढवण्याचे स्वप्न उराशी बाळगून मैदानावर घाम गाळणाऱ्या या उमद्या तरुणाने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिक्रापूर पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची (एडीआर) नोंद केली असून अधिक तपास हवालदार बापू हाडगळे करत आहेत. या घटनेमुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे