बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवसेनेचा महापौर व्हावा अशी जनतेची इच्छा

एकनाथ शिंदे; शिवसेना जनादेशाच्या विरुद्ध कोणताही निर्णय घेणार नाही


मुंबई : “२३ जानेवारीपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात होत आहे. या निमित्ताने मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर असावा, अशी शिवसैनिकांची इच्छा आहे. मात्र शिवसेना असा कोणताही निर्णय घेणार नाही, जो जनादेशाच्या विरोधात असेल. मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना आणि भाजपने युतीत लढवली होती, त्यामुळे ज्या ठिकाणी युतीत निवडणूक लढवली आहे, तिथे महायुतीचाच महापौर होईल”, अशी भूमिका शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन करताना मांडल्याची माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली.


दरम्यान, पालिका निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना वांद्रेतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. सोमवारी सकाळी सर्व २९ नगरसेवक आपला गट स्थापन करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तालयात जाणार होते. त्यानुसार, त्यांना सकाळी १० वाजेपर्यंत हॉटेलमधून चेकआऊट करण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र, कोकण विभागीय आयुक्तालयाचा दौरा अचानक रद्द करण्यात आला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या शपथविधीनिमित्त शिवसेनेचे प्रमुख नेते दिल्लीत असल्याने, हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

नगरसेवकांची मूळ कागदपत्रे पक्षाकडे जमा


गेल्या चार दिवसांपासून वांद्रेतील हॉटेलमध्ये असलेल्या शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना मंगळवारी आपापल्या मतदारसंघात जाण्याची मुभा देण्यात आली. त्याचवेळी गटनोंदणीसाठी आवश्यक असलेले सर्व मूळ दस्तावेज त्यांच्याकडून घेण्यात आले आहेत. पक्षाने जी कागदपत्रे विजयी नगरसेवकांकडून घेतली आहेत त्यात १६ तारखेला निकालानंतर मिळालेल्या निवडीचे प्रमाणपत्राचाही समावेश आहे. त्याशिवाय सर्व नगरसेवकांचे आधार कार्डही पक्षाने घेतले आहे.

Comments
Add Comment

महापौर निवडणुकीसाठी अवधी कमी, सुट्टीच्या दिवशी करावी लागणार महापौरांची निवड

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक येत्या ३० जानेवारीला होण्याची शक्यता वर्तवली जात असली

डोंबिवलीत गॅस गळती, बालकासह पाच जण जखमी

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेच्या नवनीत नगरमध्ये घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरमधून वायू गळती झाली. या गॅस

ट्रम्पनी शेअर केला अमेरिकेचा नवा नकाशा, नकाशात कॅनडा आणि ग्रीनलँडचा समावेश

वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नकाशा शेअर केला आहे. या नकाशात ट्रम्प यांनी कॅनडा आणि

युएईच्या अध्यक्षांच्या तीन तासांच्या भारत दौऱ्यात अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली : यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या दिल्ली दौऱ्याने भारत-यूएई संबंधांना

नदी पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्राचे मोठे पाऊल

देशातील पहिल्या राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाचे मंत्री पंकजा मुंडे यांनी केले सादरीकरण नवी दिल्ली :

मुंबईच्या महापौर पदाबाबत भाजप-शिवसेना नेत्यांची दिल्लीत बैठक

मुंबई : मुंबईच्या महापौर पदाबाबत सोमवारी सायंकाळी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये दिल्लीत खल झाला. शिवसेनेचे