नदी पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्राचे मोठे पाऊल

देशातील पहिल्या राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाचे मंत्री पंकजा मुंडे यांनी केले सादरीकरण


नवी दिल्ली : महाराष्ट्रातील नद्यांना प्रदूषणाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक पुढाकार घेतला असून, यासाठी 'राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण' स्थापन करण्याची महत्त्वपूर्ण संकल्पना मांडली होती. राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन यासंदर्भातील देशातील पहिल्या प्रस्तावाचे सादरीकरण केले.


या विशेष बैठकीत पंकजा मुंडे यांनी राज्यातील जल आणि पर्यावरण प्रकल्पांच्या सद्यस्थितीवर सविस्तर चर्चा केली. नद्यांच्या स्वच्छतेसाठी केंद्र सरकारच्या मदतीसोबतच राज्याची स्वतःची एक स्वतंत्र यंत्रणा आणि नियोजन असणे काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. श्रीमती मुंडे यांनी देशातील अनेक नद्या विविध राज्यांतून प्रवाहित होतात. जर प्रत्येक राज्याने आपल्या भौगोलिक सीमेतील नदीपात्राच्या स्वच्छतेसाठी आणि पुनरुज्जीवनासाठी स्थानिक पातळीवर प्रभावी व सुनियोजित योजनांची अंमलबजावणी केली, तर नद्यांचे पूर्णतः प्रदूषणमुक्त होण्याचे स्वप्न सत्यात उतरू शकेल असे सांगितले. या प्रक्रियेमुळे भविष्यात नद्यांचे पावित्र्य आणि त्यांची नैसर्गिक प्राकृतिकता टिकवून ठेवण्यात देशाला मोठे यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.


या प्रस्तावावर केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्राने याबाबत घेतलेल्या पुढाकारबद्दल विशेष कौतुक केले आणि यासाठी सर्वोतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले.


या बैठकीस राष्ट्रीय नदी संरक्षण संचलनालयाचे (NRCD) संचालक राजेश कुमार, महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव श्रीमती जयश्री भोज यांसह केंद्र व राज्यातील इतर वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

युएईच्या अध्यक्षांच्या तीन तासांच्या भारत दौऱ्यात अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली : यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या दिल्ली दौऱ्याने भारत-यूएई संबंधांना

Indian Army : यावर्षी कर्तव्य पथावर दिसणार हे 'सहा शस्त्र' जी पाकिस्तानसह कोणत्याही शत्रूला भरवतील धडकी

नवी दिल्ली : भारताच्या कर्तव्य पाथ (प्रजासत्ताक दिन परेड) मध्ये यंदा देशाच्या संरक्षण आणि सामर्थ्याचे प्रदर्शन

भारतावर पुन्हा होणार दहशवादी हल्ला ? व्हायरल झालेल्या व्हिडीओमागचं सत्य आलं समोर

कराची : सोशल मीडियावर पाकिस्तानातून भारताला उद्देशून केलेले धमकीचे व्हिडीओ नवे नाहीत. मात्र सध्या व्हायरल होत

मोकाट कुत्र्यांचा हल्ला; मुरादाबादमध्ये चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू, परिसर हादरला

मुरादाबाद : उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याने एक हृदयद्रावक घटना घडली आहे. चार

Nitin Nabin : "नितीन नवीन आता माझेही बॉस!"; भाजपच्या नव्या अध्यक्षांच्या सन्मानार्थ पंतप्रधान मोदींचे भावूक उद्गार

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा नितीन नवीन यांनी स्वीकारल्यानंतर आयोजित

एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; नेमक प्रकरणं काय

सहारनपूर : उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये एका कुटुंबाचा एकाच रात्रीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस