महापौर निवडणुकीसाठी अवधी कमी, सुट्टीच्या दिवशी करावी लागणार महापौरांची निवड


  • मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक येत्या ३० जानेवारीला होण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी प्रत्यक्षात एवढ्या कमी कालावधीमध्ये ही निवडणूक घेणे अशक्यच असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येत्या ३० जानेवारी रोजी महापौर पदाची निवडणूक होते की सुट्टीच्या दिवशी शनिवारी ३१ जानेवारी किंवा १ फेब्रुवारी की ०२ फेब्रुवारी रोजी होईल याबाबत तर्क लढवले जात आहे.


मुंबईच्या महापौर पदासाठी येत्या २२ जानेवारी रोजी आरक्षण सोडत काढली जात असल्याने भाजपच्या दिल्लीचा हवाल देत महापौर पदाची निवडणूक येत्या ३० जानेवारी रोजी होईल अशाप्रकारचे चित्र रंगवले जात आहे. परंतु २२ जानेवारी नंतर एकमेव शुक्रवारचा दिवस असून त्यानंतर सलग तीन दिवस सुट्टी आहे. त्यामुळे याचे नोटीफिकेशन जाहीर करून त्यानुसार महापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर करण्याचा तसेच उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी गृहीत धरल्यास एवढ्या कमी अवधीमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे अशक्य आहे. खुद्द महापालिका सचिव विभागाला याबाबत कोणत्याही सूचना नाही. त्यातच सुट्ट्या येत असल्याने त्या वगळून हा कार्यक्रम जाहीर करणे आवश्यक आहे. त्यामुळे ही निवडणूक जरी घ्यायची झाल्यास शनिवारी किंवा रविवारी सुट्टीच्या दिवशी घ्यावी लागेल किंवा सोमवारी २ फेब्रुवारी रोजी घ्यावी लागेल अशाप्रकारचे चित्र आहे.त्यामुळे महापौर निवडणुकीबाबत कार्यक्रम जाहीर कशाप्रकारे होतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांची काळजी घ्यावी; पाऊस आणि वाऱ्यापासून पिकांना सुरक्षित ठेवावे मुंबई :

ई-रिक्षां व ई-बाईकसाठीही परमिट (परवाना ) बंधनकारक करण्याचा निर्णय -- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सींसाठी नवीन परमिट देण्याची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून तात्पुरती स्थगित

Railway LPG Shortage : इंधन संकटाचा रेल्वे खानपान सेवेला फटका; वडापाव-समोसे मेन्यूमधून गायब होणार?

मुंबई : एलपीजीच्या सध्याच्या कमतरतेचा परिणाम रेल्वे स्थानकांमधील रेस्टॉरंट्सवर होऊ लागला आहे, अनेक

येत्या ३१ मार्च २०२६ पूर्वी पाण्याचे बिल न भरल्यास पाण्याची लाइन कापणार

मुंबई: महानगरपालिकेमार्फत नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यात येत असून सर्व जलजोडणीधारकांनी प्रलंबित

स्थापत्य समिती शहर अध्यक्षपदी यामिनी जाधव, उपनगरे समिती अध्यक्षपदी संगिता शर्मा यांची निवड

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षपदी शिवसेनेच्या यामिनी यशवंत जाधव तर उपाध्यक्षपदी

महापालिका शाळांमध्ये पोषक आहार अद्याप तरी सुरळीतच; संस्थांना सिलिंडर पुरवण्यासाठी रेशनिंग कंट्रोलला महापालिका प्रशासनाच्या सूचना

मुंबई: मुंबईत इंधनाचा तुटवडा जाणवू लागल्यानंतर महापालिका शाळांमध्ये गॅस सिलिंडरमुळे मुलांच्या तोंडची खिचडी