मुलुंड,भांडुपची एस अँड टीची प्रभाग समितीचा अध्यक्ष ठरणार ईश्वर चिठ्ठीवर?
सचिन धानजी मुंबई : मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया पार पडल्यानंतर नगरसेवकांची निवड झालेली असून महापौरांच्या निवडीची पुढील प्रक्रिया पार जाणार असली तरी मुंबईतील १९ प्रभाग समित्यांपैंकी ०८ प्रभाग समित्या या भाजप आपल्याकडे राखणार आहे. तर उबाठा आणि मनसे युती हे ०६ प्रभाग समित्या तसेच काँग्रेस पक्ष हा उबाठा आणि समाजवादी पक्षाच्या जोरावर दोन अशाप्रकारे प्रभाग समित्या आपल्याकडे राखणार आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या एस अँड टी प्रभाग समितीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नगरसेवक समसमान असल्याने याठिकाणी ईश्वर चिठ्ठीने प्रगा समिती अध्यक्ष पद निवडला जाणार आहे.
मुंबई महापालिकेत सन २०१७मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्येनुुसार मुंबईत उबाठाच्या हाती आठ प्रभाग समित्या होत्या. त्यातील दोन प्रभाग समित्या आता उबाठाला गमवण्याची वेळ आली आहे. तर भाजपने पहारेकऱ्यांची भूमिका बजावली असली तरी त्यांच्याकडे ०९ प्रभाग समित्या होत्या. परंतु यावेळी ८९ नगरसेवक निवडून आले असले तरी त्यांच्याकडे ०८ प्रभाग समित्या येवू शकतात.
एवढेच नाही काँग्रेस पक्षाचे दोन प्रभाग समित्यांमध्ये जास्त बळ असल्याने उबाठा आणि मनसे तसेच समाजवादी पक्षाच्यावतीने दोन प्रभाग समित्यांवर वर्चस्व असेल.तर कुर्ला एल विभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक निवडून आल्याने त्यांची मते निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे या दोन मतांचा कौल जिथे असेल त्या पक्षाचा नगरसेवक हा प्रभाग समिती अध्यक्ष असेल. शिवाय एस अँडटी प्रभाग समित्यांमध्ये भाजपचे ०९ आणि शिवसेना ०१ तसेच उबाठाचे ०८ आणि काँग्रेस तसेच मनसे यांचे प्रत्येकी एक याप्रमाणे प्रत्येकी समसमान मतदान होणार असल्याने याठिकाणी ईश्वर चिठ्ठीने प्रभाग समिती अध्यक्षांची निवड केली जाण्याची शक्यता आहे. अर्थांत यातील विरोधी गटाचे मत अवैध ठरल्यास एस अँड टी प्रभाग समिती सर्वाधिक मते मिळणाऱ्या ईश्वर चिठ्ठी न काढता जावू शकते.
भाजप काेणत्या मिळवणार प्रभाग समित्या : सी आणि डी, , के पश्चिम, पी दक्षिण, आर दक्षिण, आर उत्तर व आर मध्य, एम पश्चिम, एन विभाग, के दक्षिण
उबाठा आणि मनसे युती कडे या राहतील प्रभाग समित्या: एफ दक्षिण व एफ उत्तर , जी दक्षिण, जी उत्तर, एच पूर्व व एच पश्चिम, के पूर्व, के उत्तर
एमआयएमच्या वाट्याला येणारी प्रभाग समिती : एम पूर्व
काॅंग्रेस उबाठा आणि समाजवादी जोरावर मिळवल्या जाणाऱ्या प्रभाग समिती: ए बी आणि ई, पी उत्तर व पी पश्चिम ईश्वर चिठृठी : एस आणि टी :
राष्ट्रवादी काँग्रेस निर्णायक मतदान ठरणारी प्रभाग समिती : एल प्रभाग समिती
Sachin kiran Redij January 19, 2026 11:24 PM
खूपच छान विश्लेषण देणारा लेख 👍